मुंबई: पार्क केलेल्या बसमागे लघुशंका करत असलेल्या चालकाला चोर समजत जमावाकडून मारहाण, मृत्यू

मात्र जमावाने त्याला चोर समजून जबरदस्त मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित बस चालकाचा मृत्यू झाला आहे.

Representational Image (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबईतील (Mumbai) एका शाळेचा बस चालक पार्क केलेल्या बसमागे लघुशंका करत होता. मात्र जमावाने त्याला चोर समजून जबरदस्त मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित बस चालकाचा मृत्यू झाला आहे.टाईम्स ऑफ इंडियाने  दिलेल्या वृत्तानुसार, शाळेच्या बस चालकांमधीलच एका बस चालकाने मॉब लिंचिंग (Mob Lynching) करत लघुशंका करत असलेल्या चालकाला जमावाकडून मारहाण करण्या सांगितले.

लघुशंका करत असलेल्या ठिकाणी दुसऱ्या बस चालकाने खोटा अलार्म वाजवला. तसेच पीडित चालक बसची बॅटरी चोरत असल्याचा आळ त्याच्यावर घेतला. त्यानंतर परिसरातील आजूबाजूच्या जमावाने पीडित चालकाला लाथाबुक्के मारह जबर मारहाण केली. दरम्यान पीडित चालक मी चोर नसल्याचे सांगत असून ही कोणीही त्याचे ऐकले नाही.(मुंबई: चारित्र्याच्या संशयावरुन माथेफिरु पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या)

चालकाला जमावाकडून जवळजवळ 20 मिनिटे मारहाण करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला टाकून देत सर्वजण निघून गेले. मात्र तेथील एका व्यक्तीने चालकाची ओखळ पटवत त्याचा परिवाराला याबाबत माहिती दिली. परंतु रुग्णालयात उपाचारसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आतापर्यंत चार जणांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.