Mumbai Metro Flooding: नव्याने उद्घाटन झालेलं वरळी मेट्रो स्थानक पहिल्याच पावसात जलमय; Aqua Line मार्गावरील सेवा अर्धवट बंद

मुंबईतील वरळी मेट्रो स्थानक उद्घाटनानंतर काहीच दिवसांत पावसामुळे जलमय झालं. मेट्रो सेवा अर्धवट बंद, वाहतूक आणि रेल्वे सेवा विस्कळीत. IMD कडून रेड अलर्ट जारी.

Mumbai Metro Flooding: नव्याने उद्घाटन झालेलं वरळी मेट्रो स्थानक पहिल्याच पावसात जलमय; Aqua Line मार्गावरील सेवा अर्धवट बंद
Mumbai Metro Flooding | (Photo Credit- X)

मुंबईच्या अ‍ॅक्वा लाईन (Aqua Line Metro-3) वरील नव्याने सुरू झालेलं वरळी अंडरग्राउंड मेट्रो (Mumbai Underground Metro Flooding) स्थानक पावसाच्या पाण्याने भरून गेलं असून सोमवारी सकाळी ते अंशतः बंद (Worli Station Rain Damage) करण्यात आलं. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मॉन्सूनची सुरुवातच धक्कादायक ठरली आहे. शहरात या वर्षात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस पडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे शहरातीव सार्वजनिक व्यवस्था आणि प्रशासनासह सरकारची मान्सून हंगामाची सुरुवात गोंधळलेली ( Mumbai Rain Disruption) आणि नाट्यमय झाली. शहरातील नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या अंडरग्राऊंड मेट्रो (Mumbai Underground Metro) सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

पाणी साचल्यामुळे मेट्रो सेवा अर्धवट बंद

मुंबईच्या अ‍ॅक्वा लाईन (मेट्रो लाईन-3) वरील नव्याने सुरू झालेलं वरळी अंडरग्राउंड मेट्रो स्थानकातील प्लॅटफॉर्मवर पाणी साचल्यामुळे मेट्रो सेवा वरळीपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली. ट्रेन आचार्य अत्रे चौकापर्यंत न जाता केवळ वरळीपर्यंत धावल्या. या प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आणि सोशल मीडियावर नवीन स्टेशनच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका करण्यात आली. पाण्याखाली गेलेल्या प्लॅटफॉर्मचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. (हेही वाचा, Mumbai Rains Red Alert: मुंबईत संततधार सुरुच! आयएमडीकडून 27 मे पर्यंत रेड अलर्ट; कसे असेल उद्याचे हवामान?)

मुंबईत ठिकठिकाणी विस्कळीत जनजीवन

या हंगामातील सर्वात मोठ्या पावसांपैकी एक सोमवारी (26 मे) मुंबईत झाला. यामुळे पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि लोकल सेवा उशिराने धावणे अशा अनेक समस्या उद्भवल्या. केवळ 9 ते 10 वाजेपर्यंत नरीमन पॉईंटमध्ये 104 मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील इतर भागातही जोरदार पाऊस झाला. (हेही वाचा, Kemps Corner Road Collapse: मुंबईत मुसळधार पाऊस; केम्प्स कॉर्नर रस्त्याचा काही भाग खचला, वाहतूक प्रतिबंधित)

हार्बर लाईनची सेवा ठप्प, रस्ते वाहतुकीस फटका

सेंट्रल रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वडाळा रोड ते CSMT दरम्यानची सेवा मस्जिद स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आली. रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली होती. हिंदमाता, किंग्स सर्कल आणि परळ या मुख्य चौकात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पहिल्याच पावसात अंडरग्राऊंड मेट्रो जलमय

हवामान खात्याचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी दिलेला ऑरेंज अलर्ट रेड अलर्टमध्ये रूपांतरित केला. याचा अर्थ प्रचंड मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं स्पष्ट झालं. BMC कडून मोठ्या भरतीसह आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अतिवृष्टीमुळे नव्याने सुरू झालेल्या वरळी स्थानकात पाणी साचल्याने मुंबईतील पायाभूत सुविधांची विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मॉन्सूनच्या सुरुवातीलाच सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2025 03:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).