Mumbai Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा संपूर्ण वेळापत्रक
मुंबईच्या मध्य (Central) आणि हार्बर (Harbour Line) रेल्वे मार्गांवर आज विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) ठेवण्यात आला आहे.
मुंबईच्या मध्य (Central) आणि हार्बर (Harbour Line) रेल्वे मार्गांवर आज विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, ठाणे आणि कल्याण दरम्यान अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच पनवेल-वाशी अप व डाउन मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 340 दरम्यान सर्व रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 3 या वेळेत सुटणाऱ्या पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 या वेळेत बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागात विशेष लोकल गाड्या धावतील.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.17 या वेळेत सुटणा-या डाउन जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर, कल्याण येथून सकाळी 9.47 ते दुपारी 2.47 दरम्यान सुटणारी जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील तसेच ठाणे येथून अप फास्ट मार्गावर वळविण्यात येतील व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे आहे. हे देखील वाचा- Maharashtra Unlock 4: 'मुंबई लोकल सुरु करण्यास रेल्वे तयार' पण ही आहे अडचण, घ्या जाणून
मध्य रेल्वेचे ट्वीट-
सध्या लोकल प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे खासगी कार्यालयातील कर्मचारी, छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार इत्यादींना पूर्णपणे बेस्ट, एसटी व खासगी वाहनावरच अवलंबून राहावे लागते. या प्रवासात तासंतास जातो. त्यामुळे मानसिक व शारीरीक हालही होतात. रेल्वे प्रशासन लोकल सुरु करण्यास उस्तुक आहे. मात्र, प्रवासाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारकडे बोट दाखवले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)