मुंबई: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची कमाठीपूरा येथे आर्थिक वादातून हत्या

ही घटना कमाठीपूरा (Kamathipura) परिसरात घडली. मृत महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून अर्थिक वादातून ही हत्या झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिकात्मक फोटो. (Photo Credit: PTI)

मुंबई (Mumbai) येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या (Sex Worker) महिलेचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना कमाठीपूरा (Kamathipura) परिसरात घडली. मृत महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून अर्थिक वादातून ही हत्या झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भांडण सुरु असताना मध्यसी पडलेल्या तरुणावरही आरोपीने चाकू हल्ला करत तेथून पळ काढला. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्थानिक पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

रेश्मा शेख असे कमाठीपूरा येथे वैश्य व्यवसाय करणाऱ्या मृत महिलेचे नाव आहे. तसेच जितेंद्र सिंह असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. रेश्मा आणि जितेंद्र अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. परंतु, सोमेवारी रेश्मा आणि जितेंद्र आर्थिक वाद झाला. या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. दरम्यान, जितेंद्र हा रेश्माला अपशब्दांचा वापर करु लागला. त्यावेळी रेश्मानेही जितेंद्र याला अपशब्द वापरुन शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर जितेंद्र अधिकच भडकला आणि जवळ असलेल्या चाकूने रेश्मावर वार करु लागला. रेश्माचा आवाज ऐकून जितेंद्र याला रोखण्यासाठी आलेल्या तरुणावरही आरोपीने हल्ला करुन पळ काढला. रेश्माचा पती किशन मंडाळ याने या प्रकणाची पोलिसांनी माहिती देत जितेंद्र याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. सध्या स्थानिक पोलीस जितेंद्रचा शोध घेत आहेत. हे देखील वाचा- आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या

शेहबाज मरचंद असे रेश्मा आणि जितेंद्र यांचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाचे नाव आहे. शेहबाज याच्यावर कमाठीपूरा जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif