हमीद अन्सारी पाकिस्तानमधून सुखरुप मायेदेशी परतला

पाकिस्तान (Pakistan) मध्ये गेली 3 वर्षे प्रेयसीच्या पोटी शिक्षा भोगणारा भारतीय तरुण हमीद अन्सारी (Hamid Ansari) आज सुखरुपपणे पाकिस्तानमधून भारतात (India) आला आहे.

हमीद अन्सारी (फोटो सौजन्य-ANI)

पाकिस्तान (Pakistan) मध्ये गेली 3 वर्षे प्रेयसीच्या पोटी शिक्षा भोगणारा भारतीय तरुण हमीद अन्सारी (Hamid Ansari)आज सुखरुपपणे पाकिस्तानमधून भारतात (India) आला आहे. पाकिस्तानमध्ये त्याची सुटका झाल्यानंतर हमीदच्या परिवाराने शासनाचे धन्यवाद मानले आहेत. हमीदला भेटताना त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंनी वाहताना दिसून आले.

हमीदने पाकिस्तानातून सुटेकेचा निश्वास सोडला आहे.तेथून निघताना वाघा बॉर्डरच्या सीमारेषेला नमस्कार केल्याचे दिसून आले. तसेच तेथे उपस्थित असलेल्या मंडळींनी हामीदच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हमीदची आई मुंबईतील एका महाविद्यालयात उपप्राचार्य आहे.तर वडिल बँकेत कार्यरत होते. (हेही वाचा-प्रेमात आंधळा झालेल्या भारतीय तरुणाची पाकिस्तान येथून 6 वर्षानंतर घरवापसी)

पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने हामिद बद्दल दिलेल्या निर्णयाला 15 डिसेंबर रोजी त्याची 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाली. तसेच हामिदला कायद्यानिशी सुटकेसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. तर 15 डिसेंबर 2015 पासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला हामिद आज तब्बल सहा वर्षांनी घरी आला आहे



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif