Thane: होळीची बक्षिसी दिली नाही म्हणून, खासगी बस ड्रायव्हरच्या कानाचा घेतला चावा; आरोपी व त्याच्या मित्राला अटक
या दिवशी ठाण्यामध्ये (Thane) घडलेली एक दुर्घटना समोर येत आहे. होळीच्या निमित्ताने ठाण्यातील वॉटर व्हॉल्व्ह ऑपरेटरने, एका खासगी बस चालकाला टीप म्हणून पैसे मागितले होते
काल देशभरात होळीचा (Holi) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या दिवशी ठाण्यामध्ये (Thane) घडलेली एक दुर्घटना समोर येत आहे. होळीच्या निमित्ताने ठाण्यातील वॉटर व्हॉल्व्ह ऑपरेटरने, एका खासगी बस चालकाला टीप म्हणून पैसे मागितले होते. मात्र या चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने या ऑपरेटरने चक्क चालकाच्या कानाचा जोरात चावा घेतला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी आरोपी व त्याचा मित्र अशा दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पिडीत चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोमेश्वर पाफळ आणि पंकज इंगळे अशा या दोन्ही ऑपरेटरची नावे आहेत. हे दोघे ऑपरेटर गांधी नगर भागात पार्क केलेल्या बसेसची साफसफाई करण्याचे काम करतात. याच परिसरात ही घटना घडली. रागाच्या भरात एखाद्याच्या कानाचा चावा घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे दोन वर्षांपूर्वी दिल्लीत, एका मद्यधुंद व्यक्तीने दुसर्या माणसाच्या कानाचा तुकडा दाताने तोडून तो गिळला होता. दुसर्या एका घटनेत, सार्वजनिक नळावरून पाणी घेण्याच्या भांडणात रागाच्या भरात एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या कानाचा लचका तोडला होता. (हेही वाचा: ठाणे: वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांना मिळणार गरमागरम वडापाव)
दरम्यान, काल होळीदिवशी देशात कमीतकमी 27 लोकांचा मृत्यू झाला, ज्यातील 13 लोक ओडीसाचे आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात होळीचा उत्साह दरवर्षीपेक्षा कमी होता. धुळवडीच्या दिवशी पुणे शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारामारीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये होळी खेळल्यानंतर तलावामध्ये आंघोळ करताना, चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील कालव्यात बुडून एका 32 वर्षीय मजुराचा मृत्यू आहे.