मालाड: रात्रीच्या वेळेस घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणी समोर अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

आरोपी हा मालवणी मालाड येथे राहणारा असून मोहम्मद कादर असे त्याचे नाव आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मुंबई मधील मालाड येथे रात्रीच्या वेळेस घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणी समोर अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मालवणी मालाड येथे राहणारा असून मोहम्मद कादर असे त्याचे नाव आहे.

पीडित तरुणी 1 सप्टेंबरला ऑफिसवरुन रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तरुणी बसची वाट पाहत उभी असताना तिच्या समोर मोहम्मद याने त्याची रिक्षा थांबवली. तसेच घरी जाण्यासाठी मी सोडते असे सुद्धा म्हणाला. त्यावेळी तरुणीने तिच्याकडे पाहिले असता त्याने अचानक हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी तरुणीने घाबरुन न जाता मोबाईलवर मोहम्मद याचा सुरु असलेला प्रकार व्हिडिओ शूट केला. मात्र तरुणी मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचे त्याने पाहिले असता तेथून पळ काढला.(कांदिवली येथे रिक्षात बसलेल्या महिलेसमोर अश्लील चाळे, रिक्षाचालकाला अटक)

ANI ट्वीट:

या प्रकरणी सदर तरुणीने आईच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. आरोपी मोहम्मद याच्या विरोधात तक्रार दाखल करत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद याला अटक करण्यात आली आहे. तर मोहम्मद याच्या विरोधात अन्य पोलीस स्थानकात ही गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे.

यापूर्वी सुद्धा रिक्षाचलकांकडून महिलांसमोर अश्लील चाळे करण्यात आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. तरीही मुंबईत हे प्रकार थांबवण्याचे नाव घेत असून त्यात अधिक भर पडत आहे. तसेच मुंबईत एका 19 वर्षीय मुलीसोबत गर्दीचा फायदा घेत तिच्या समोर हस्तमैथुन करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार ही समोर आला होता.