India-China Clash: मुंबई येथील घाटकोपर परिसरात मनसे कार्यकर्त्यांचे चीन विरोधात आंदोलन
प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष उफाळून आला होता.
प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष उफाळून आला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले असून, भारतात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई (Mumbai) येथील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी चीन विरोधात आंदोलन केले आहे. चीनच्या कुरापतींच्यामुळे संपूर्ण भारतातून संताप व्यक्त केला जात आहे.
भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये 15 जून रोजी रात्री हिंसक झटापट झाली आहे. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितले. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. भारतीय सेन्यातील 20 जवान शहिद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण भारत पेटून उठला आहे. तसेच भारतात आयात होणाऱ्या चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला, अशा मागणींही अधिक जोर धरला आहे. हे देखील वाचा- मुंबई: अंधेरीतील शिवाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने Mission Zero Rapid Action Plan लॉन्च
एएनआयचे ट्वीट-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. रशियातल्या मॉस्को शहरात होणाऱ्या 75 व्या विजय दिवस परेडमध्ये सहभागी होण्यासाठी ते रशियाला रवाना झाले आहेत. आपल्या देशात लॉकडाउन जाहीर केल्यानंतरचा राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच दौरा आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे. तणावाच्या या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह या संदर्भात रशियासोबत काही चर्चा करणार का? याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.