Mumbai Local Update: मुंबई लोकल सुरु करण्याबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? जाणून घ्या

याबद्दल आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Rajesh Tope | (Photo Credits- Twitter)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Service) पुन्हा कधी सुरु होणार, याची सर्वांना प्रतिक्षा आहे. याबद्दल आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करु, मात्र अंतिम निर्णय रेल्वे प्रशासनाचाच असेल, असे टोपे यांनी टीव्ही9 शी बोलताना सांगितले. त्याचबरोबर त्यांनी बोगस लसीकरण, आरोग्य विकास योजना या मुद्द्यांवरही संवाद साधला.

मुंबई लोकल कधी सुरु होणार?

लोकल सेवा सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करु. मात्र अंतिम निर्णय रेल्वे प्रशासनाकडेच असेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. (Mumbai Local Update: बोगस ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांना बसणार चाप; Universal Travel Pass चं सरकारचं नियोजन)

बोगस लसीकरणाबाबत कारवाई सुरु

राज्य सरकारला बोगस लसीकरणाबाबत अहवाल प्राप्त झाला असून पोलिसांनी यासंदर्भात कारवाई सुरु केली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात बोगस लसीकरणाचे अनेक प्रकार उघडीकस आले आहेत. यासंदर्भात पालिकेने योग्य माहिती दिल्यास आम्ही पुढील कारवाई करु, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री आरोग्य कौशल्य विकास योजना

मुख्यमंत्री आरोग्य कौशल्य विकास योजनेचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात रोजगाराची आणि प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देणे हा योजनेचा हेतू आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम मोफत असून याअंतर्गत दहावी-बारावीच्या पर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.

तसंच महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचंही त्यांनी यावेळी सागितलं. दरम्यान, 'मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत कोरोनामध्ये आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रात 36 अभ्यासक्रमांमधून येत्या 3 महिन्यात 20 हजार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif