Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेच्या कल्याण - ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाड; जलद लोकल रद्द तर लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या

सीएसएमटी कडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने धावत आहे. यामुळे मुंबईकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रखडत चालणारी मध्य रेल्वे (Central Railway)  आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. कल्याण -ठाकुर्ली (Kalyan Thakurli) या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा मध्य रेल्वेचं वेळापत्रक आजही कोलमडलं आहे. सीएसएमटी कडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने धावत आहे. यामुळे मुंबईकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक सलग पाचव्या दिवशी वेळापत्रक कोलमडल्याने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी पहायला मिळत आहे. Mumbai Rains Update: मुंबई मध्ये पुन्हा पावसाला सुरूवात, पुढील 2-3 तास दमदार सरी बरसणार; स्कायमेटचा अंदाज

मागील काही दिवसांपासून मुंबईत दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे सखल भागात पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक रखडत रखडत सुरू होती. त्यामध्ये आता या नव्या तांत्रिक दोषामुळे भर पडली आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या 2 तासांहून अधिक काळ स्टेशनमध्ये अडकून पडल्या आहेत. तर लोकल रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवर जलद मार्गावरील गाड्याचं वेळापत्रक कोलमडलं आहे तर धीम्या मार्गावरील गाड्या किमान 15-20 मिनिटं उशीराने धावत आहेत.