Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो मेगा ब्लॉक वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा
आज (रविवार, 24 जुलै) मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात आला आहे.
Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी तुम्ही जर घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज (रविवार, 24 जुलै) मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात आला आहे. काही तांत्रिक कामामुळे हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. केवळ मध्य रेल्वेच नव्हे तर ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असेल. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.30 पासून दि. रविवारी पहाटे 4.05 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर डाऊन मार्गावर रविवारी मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
ट्रान्स हार्बर मार्ग मेगा ब्लॉक
- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्ग- रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर,खारकोपर BSU मार्गा व्यतिरिक्त)
- पनवेल-ठाणे अप सेवा- रविवारी सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ट्रेन रद्द
- पनवेल-ठाणे डाऊन सेवा- 10.01 पासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत रद्द
- बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर - नियोजित वेळेनुसार धावतील
दरम्यान, मेगाब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी या सेक्शनमध्ये विशेष लोकल सुरु राहतील. याशिवाय ट्रान्सहार्बर मार्गावरही ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकादरम्यानही सेवा उपलब्ध राहतील.
दरम्यान, मेगाब्लॉक विचारात घेऊन काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. 24 जुलै रोजी सकाळी 5.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. ही गाडी 10 मिनीटे उशीराने सुरु होईल.