Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर 30 एप्रिलला ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे तर पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते सांताक्रुझ दरम्यान ब्लॉक असेल.
मुंबई लोकलची देखभाल आणि दुरूस्तीची कामं रविवारी मेगा ब्लॉक (Mumbai Local Mega Block) जाहीर करून केली जातात. मध्य , हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक दरम्यान काही काळ रेल्वे सेवा स्थगित केली जाते. यंदा 30 एप्रिलच्या रविवारी या तिन्ही मार्गांवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे तर पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते सांताक्रुझ दरम्यान ब्लॉक असेल. या ब्लॉकच्या वेळेमध्ये काही लोकल फेर्या रद्द केल्या जाणार आहेत तर काही उशिराने धावतील अशी माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 दरम्यान ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी वरून सुटणाऱ्या फास्ट लोकल्स या माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे या फास्ट लोकल डाऊन फास्ट मार्गावर चालवल्या जातील. ठाण्यातून सुटणाऱ्या फास्ट मार्गावरील लोकल या मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर चालवल्या जातील. माटुंग्यानंतर त्या पुन्हा फास्ट मार्गावर धावतील.
हार्बर मार्गावर देखील सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. या काळात सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेल साठी डाऊन मार्गावर आणि वांद्रे/ गोरेगाव येथून सुटणार्या सीएसएमटी स्टेशन साठी डाऊन हार्बर मार्गावर सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक च्या काळात पनवेल- कुर्ला दरम्यान मात्र 20 मिनिटांनी एक लोकल फेरी चालवली जाणार आहे. Mumbai Local Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 5 एप्रिल पासून धावणार अतिरिक्त 11 नॉन एसी लोकल्स.
पश्चिम रेल्वे मार्गावर देखील सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत ब्लॉक असणार आहे. सांताक्रुझ - जोगेश्वरी दरम्यानच्या ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस आणि काही लोकल फेर्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.