Mumbai Local Updates: मध्य रेल्वे वर 13, 14 मार्च दिवशी ब्लॉक; लोकल सह लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत
दरम्यान टिटवाळ्यामध्ये पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामांसाठी कल्याण ते कसारा अप आणि डाऊन अशा दोम्ही मार्गांवर शुक्रवार, शनिवार दिवशी ब्लॉक घेतला जाईल.
मुंबईची लाईफलाईन असणार्या मुंबई लोकलच्या (Mumbai Local) मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर 13, 14 मार्च दिवशी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान टिटवाळ्यामध्ये पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामांसाठी कल्याण ते कसारा अप आणि डाऊन अशा दोम्ही मार्गांवर शुक्रवार, शनिवार दिवशी ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे या काळात लोकल सेवांसोबतच मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्येही बदल होणार आहे. 13 मार्च शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते 14 मार्च पहाटे 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी पहाटेची पहिली कसारा लोकल रद्द केली जाणार आहे. 14 मार्चच्या रात्री पुन्हा 11.50 ते पहाटे 3.50 पर्यंत ब्लॉक असेल. दरम्यान आज सकाळी मुंबई: कल्याण स्थानकाजवळील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरु होती.
13 मार्च दिवशी रद्द झालेल्या मेल एक्सप्रेस
ट्रेन 17611 नांदेड ते सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
ट्रेन 12112अमरावती ते सीएसएमटी एक्स्प्रेस
ट्रेन 11402 नागपूर ते सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस
ट्रेन 51154 भुसावळ ते सीएसएमटी पॅसेंजर
14 मार्चच्या पहाटे रद्द झालेल्या मुंबई लोकल
कल्याण ते आसनगाव- प. 5.28वा.
सीएसएमटी ते कसारा- प. 4.15 वा.
विद्याविहार ते टिटवाळा- प. 4.51 वा.
विद्याविहार ते टिटवाळा- प. 5.12 वा.
टिटवाळा ते सीएसएमटी- प. 4.32 वा.
टिटवाळा ते सीएसएमटी- प. 5.35 वा.
मध्य रेल्वे वरील या ब्लॉकचा परिणाम जसा लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला आहे. तसाच तो मुंबई लोकलवरही होणार असल्याने यंदा विकेंडला बाहेर जाण्याचा काही प्लॅन करणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करा. दरम्यान दर रविवारी मुंबई लोकलच्या तिन्ही मुख्य रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेतला जातो. यादरम्यान रूळाचे, तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणा याच्यातील दुरूस्तीचे काम केले जाते.