मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बफरला धडकली लोकल; फलाट क्रमांक तीनवर घडली घटना

अचाकन घडलेल्या या प्रकाराने प्रवासी मात्र घाबरुन गेले. या घटनेनंतर सीएसएमटी स्थानकावरील रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिली. दरम्यान, ही लोकल चालवत असलेल्या मोटरमनचे नाव समजू शकले नाही.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( CSMT)  येथे एक लोकल (Mumbai Local) थेट बफरला जाऊन धडकली. ही घटना फलाट क्रमांक तीनवर शुक्रवारी (30 ऑगस्ट 2019) दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अचाकन घडलेल्या या प्रकाराने प्रवासी मात्र घाबरुन गेले. या घटनेनंतर सीएसएमटी स्थानकावरील रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिली. दरम्यान, ही लोकल चालवत असलेल्या मोटरमनचे नाव समजू शकले नाही.

सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा प्रकारची घटना घडली होती. ही घटना 26 एप्रिल 2019 रोजी घडली होती. ही घटना (26 एप्रिल 2019) घडली तेव्हा पंकज गुलाबचंद इंदोरा नावाचे मोटरमन लोकल चालवत होते. ते मुळचे जयपूरचे होते. पुढे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, 26 एप्रिल 2019 रोजी घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोटरमन पंकज इंदोरा यांना तातडीने बडतर्फ करा अशी मागणी केली होती. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच, लोकलचेही फारसे नुकसान झाले नाही. लोकल बफरला धडकली नाही. तर, केवळ बफरला लोकलचा धक्का लागला, असे सांगत रेल्वे प्रशासनाने पंकज गुलाबचंद इंदोरा या मोटरमनवर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला होता. दरम्यान, आज (30 ऑगस्ट 2019) रोजी घडलेल्या घटनेची चौकशी होणार का? याबाबत उत्सुकता आहे.