मुंबई: आयआयटी च्या विद्यार्थ्यांनी तयार केला AIR Scanner App; यात स्कॅनिंगसह आहेत ‘ही’ खास वैशिष्ट्ये

एआयआर स्कॅनर (AIR Scanner) असे मोबाईल ॲपचे नाव असून, 15 ऑगस्ट 2020 रोजी याचा शुभारंभ करण्यात आला. रोहित कुमार चौधरी आणि केविन अग्रवाल यांनी आपल्याला अवगत असलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत (Artificial Intelligence)हा अॅप तयार केला आहे.

AIR Scanner App (Photo Credit: PIB GOV)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महामारीमुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'आत्मनिर्भर भारत' (Atma Nirbhar Bharat)  उपक्रम सुरु केला. त्यातच भारत-चीन मधील तणावमुळे भारतात चीनी अॅपवर बंदी घालण्यात आली. या सर्वांचाच फायदा घेत मुंबईतील आयआयटीच्या (Mumbai IIT) 2 विद्यार्थ्यांसाठी स्कॅनिंगसाठी फायदेशीर ठरेल असा नवा भारतीय अॅप विकसित केला. 'AIR Scanner' असे या अॅपचे नाव आहे. आयआयटी मुंबईच्या रोहित कुमार चौधरी (Rohit Kumar Choudhary), केविन अग्रवाल (Kevin Agarwal) या विद्यार्थ्यांनी हा ॲप तयार केला आहे. त्यांचे हे पाऊल आत्मनिर्भर भारत या आव्हानाला प्रोत्साहन देणारे ठरेल.

एआयआर स्कॅनर (AIR Scanner) असे मोबाईल ॲपचे नाव असून, 15 ऑगस्ट 2020 रोजी याचा शुभारंभ करण्यात आला. रोहित कुमार चौधरी आणि केविन अग्रवाल यांनी आपल्याला अवगत असलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत (Artificial Intelligence)हा अॅप तयार केला आहे. Make in India: देसी जुगाड सोशल मीडियावर VIDEO VIRAL; पुणे येथे आत्मनिर्भर शिक्षिकेचा Online Class

AIR Scanner App (Photo Credit: PIB GOV)

या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यात कागदपत्रं स्कॅन करण्याबरोबरच ज्यांना इंग्रजी वाचनात अडचण आहे, त्यांच्यासाठी कागदपत्रांचे वाचन देखील करेल. तुम्ही मोबाईल कॅमेऱ्याने स्कॅन केलेली कागदपत्रं पीडीएफ स्वरुपात जतन केली जातात.

AIR Scanner App (Photo Credit: PIB GOV)

एआयर स्कॅनर ॲप वापरकर्त्यांची कोणतीही माहिती गोळा करत नाही आणि सर्व कागदपत्रे फोनच्या लोकल स्टोअरेजमध्ये साठवली जातात. यासाठी आम्ही क्लाऊड स्टोअरेजचा वापर करत नाही. त्यामुळे यात वापरकर्त्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी देण्यात आली आहे असे रोहित कुमार चौधरी याने याविषयी माहिती दिली.

या ॲपविषयी सांगताना रोहित कुमार चौधरी म्हणाले, “सुरुवातीला आम्ही ज्यांना इंग्रजी वाचन कठीण जाते, त्यांच्यासाठी ॲप तयार करण्यावर काम करत होतो. त्याच दरम्यान सरकारने मोबाईल स्कॅनरसह चिनी कंपन्यांच्या ॲपवर बंदी घातली. कॅम स्कॅनर या ॲपवर बंदी घातल्यानंतर आम्ही सर्वेक्षण केले की, लोकांना मोबाईल फोनच्या माध्यमातून कागदपत्रं स्कॅन करण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर आम्ही आमच्या एआयआर ॲपमध्ये स्कॅनिंग जोडण्याचा निर्णय घेतला”.

आतापर्यंत प्ले स्टोअरवर 1500 जणांनी हा ॲप डाऊनलोड केला आहे. सध्या ॲप अँड्रॉईड फोनधारकांसाठी उपलब्ध आहे, लवकरच तो आयओएस वापरकर्त्यांनाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now