मुंबई उच्च न्यायालयाने अलिबागवरुन आलास का? संबंधित दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली
त्यामधीलच एक अलिबागवरुन आलायास का? हा शब्द तर इतका सहज बोलला जातो की समोरच्या व्यक्तीलासुद्धा त्याचा राग येत नाही.
सिनेमा, नाटक किंवा एखाद्याची मस्करी करताना सहजच विविध खट्याळ पद्धतीच्या शब्दांचा उल्लेख केला जातो. त्यामधीलच एक अलिबागवरुन आलायास का? हा शब्द तर इतका सहज बोलला जातो की समोरच्या व्यक्तीलासुद्धा त्याचा राग येत नाही. परंतु अलिबाग येथे राहत असलेले राजेंद्र ठाकूर यांनी न्यायालयात या शब्दावरुन याचिका दाखल केली होती. तर अलिबागकरांच्या या शब्दांवरुन भावना दुखावल्या जात असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
तर अलिबागवरुन आलास का हा शब्द मुळात मुर्ख आहेस का अशाप्रकारे एखाद्याला उच्चारला जातो. त्याचसोबत अलिबागसंबंधित हा शब्द राज्य सरकार आणि सेन्सॉर बोर्डाने वापरण्यास मनाई करावी असे ठाकूर यांनी याचिकेत म्हटले होते. मात्र ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. तर दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (पुणे: मोबाईल खेळाच्या व्यसनातून कॉलेज तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या)
परंतु अलिबाग हे पर्यटनस्थळासोबतच एक ऐतिहासिक स्थळ असले तरीही या शब्दामुळे त्याचे सौंदर्य कुठे डगमगले जात नाही असे सुद्धा याचिकाकर्ते ठाकूर यांना न्यायालयाने म्हटले आहे. तसेच न्यायमूर्तींनी याचिका फेटाळून लावत हा एक विनोदाचा भाग असून अशा प्रकारचे विनोद अन्य समुदायांवरसुद्धा केला जातो. त्यामुळे अलिबागवरुन आलायस का हा मुद्दा मनावर घेऊ नका असे ठाकूर यांना सांगण्यात आले आहे.