'पोलिसांचा लोगो-पाटी' खासगी वाहनांवर लावल्यास होणार कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पोलिसांना त्यांच्या खासगी गाडीवर पोलिसांचा लोगो किंवा पाटी लावण्यास बंदी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पोलिसांना त्यांच्या खासगी गाडीवर पोलिसांचा लोगो किंवा पाटी लावण्यास बंदी केली आहे. तर लोगो किंवा पाटी वाहनावर लावल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कारण पोलिसांची पाटी किंवा लोगोचा वापर करत काहीजण वाहतुकीबद्दल होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी याचा उपयोग करतात. त्यामुळेच न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 203 च्या कलम 134 प्रमाणे पोलिसांनी त्यांच्याकडील वाहनावर पाटी किंवा लोगो लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहतुक पोलिसांना आठवड्याभरात कोणावर कारवाई केली त्याचा अहवालसुद्धा वाहतूक मुख्यालयात सादर करायचा आहे.(जुलै महिन्यात बॅंक व्यवहार ते बेस्ट दर कपात यामुळे सामान्यांची बदलणार अर्थिक गणित)
यामुळे पोलिसांच्या पाटी किवा लोगोचा धाक दाखवत होणारे गैरप्रकारांवर चाप बसणार आहे. त्याचसोबत न्यायालयाने न्यायाधीशांच्या बाबतसुद्धा असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यायाशीधांनाही त्यांच्या खासगी गाडीवर आपल्या पदाचा उल्लेख करता येणार नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात न्यायालयाने एक पत्रक सुद्धा काढले आहे.