मानखुर्द स्थानकात तांत्रिक बिघाड, हार्बर मार्ग रेल्वेसेवा विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

याचा परिणाम पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद पडण्यात झाला. साधारण दीड तास झाले हा बिघाड कायम असून, दोन्ही मार्गांवरील (अप, डाऊन) वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. वाहतुक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्टेशनवर गर्दीचा पूर आला आहे.

Harbor Railway | (File Image)

Mumbai: सकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याचा वेळ. नेमका याच वेळी हार्बर मार्गावरील रेल्वे (Harbor Railway Route) वाहतूकसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच. मानखुर्द स्थानकाजवळ बुधवारी (24 एप्रिल) सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तांत्रिक बिघाड दूर करुन वाहतुक सेवा सुरळीत सुरु करण्यासाठी रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या पथकाने दुरुस्तीचे कामही सुरु केले आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामाला विलंब होत असल्यामुळे मानखुर्द – पनवेल मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. पनवेलकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. (हेही वाचा, Shab e Barat 2019 Special Trains on WR: चर्चगेट-विरार मार्गावर 20 एप्रिलच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे चालवणार 2 विशेष लोकल्स)

प्राप्त माहितीनुसार मानखूर्द येथे लोकल ट्रेन पेंटाग्राफला ओव्हरहेड वायर अडकली आणि तांत्रिक बिघाड झाला. याचा परिणाम पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद पडण्यात झाला. साधारण दीड तास झाले हा बिघाड कायम असून, दोन्ही मार्गांवरील (अप, डाऊन) वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. वाहतुक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्टेशनवर गर्दीचा पूर आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif