घाटकोपर येथे राहणाऱ्या चौघांकडून 22 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण

मात्र चार जणांकडून या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा हात असल्याची बाब समोर आली आहे. तर पीडित मुलाला कुर्ला येथून आरोपींनी ट्रेस केले असल्याचे वृत्त मुंबई मिरर यांनी दिले आहे.

Say No to Sexual Assault. (Photo Credits: File Image)

मुंबईत राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला सोशल मीडियावर त्याचे सेल्फी करणे आवडत होते. मात्र चार जणांकडून या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा हात असल्याची बाब समोर आली आहे. तर पीडित मुलाला कुर्ला येथून आरोपींनी ट्रेस केले असल्याचे वृत्त मुंबई मिरर यांनी दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुल परमार (21), आसिफ अली अन्सारी (23), पियुष चौहान (22) वर्षीय अशी आरोपींची नावे आहेत. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. हे सर्व आरोपी घाटकोपर येथे राहणारे आहेत.

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, तरुणाने 8 डिसेंबरला रात्री 10.30 वाजताच्या सुमारास एका हॉटेल बाहेर सेल्फी काढला आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याचे लोकेशन सुद्धा लिहिले. मात्र ही पोस्ट केल्याच्या 15 मिनिटानंतर परमार आणि चौहान यांनी या तरुणाला संपर्क साधत इन्स्टाग्रामवरील फोटो आवडला असल्याचे म्हटले. त्यांनी एकमेकांमध्ये संभाषण सुरु करत बाईक राईड आणि धुम्रपान करण्यासाठी जाण्याची त्यांच्यामध्ये चर्चा सुरु झाली. तर 11.10 वाजताच्या सुमारास तिघांनी एका विमानतळावरील एका हॉटेलच्या येथे बाईक थांबवली आणि पीडित मुलाला कारच्या आतमध्ये जाण्यास जबरदस्ती केली. त्यानंतर या तिघांनी त्याच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.(बीड: धक्कादायक! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवले) 

या तीन आरोपींकडून सुरु असलेल्या प्रकारानंतर 20 मिनिटांनी अल्पवयीन आरोपी सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी झाला. त्यानंतर चारही जणांनी पीडित तरुणाला ओरल सेक्स करण्यास भाग पडेपर्यंत मारहाण केली. रात्री 1.30 वाजताच्या सुमारास त्याला कुर्ला येथे गाडीतून खाली फेकून देण्यात आले. या प्रकारानंतर पीडित तरुणाने त्याच्या सोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला असता त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.