Mumbai Fire: करीरोड मध्ये Avighna Park Apartment मध्ये 60 मजली इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग
अविघ्न पार्क अपार्टमेंट ही टोलेजंग असल्याने वरच्या मजल्यावर अडकलेल्यांची सुटका करण्याचे मोठं आवाहन अग्निशमन दलासमोर आहे
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) करी रोड (Curry Road) भागात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न पार्क (Avighna Park Apartment) या 60 मजली इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग लागली आहे. आज 11 वाजून 57 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली आहे. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 15 फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना रहिवाश्यांना देखील बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत.
अविघ्न पार्क अपार्टमेंट ही टोलेजंग असल्याने वरच्या मजल्यावर अडकलेल्यांची सुटका करण्याचे मोठं आवाहन अग्निशमन दलासमोर आहे. वारा असल्यामुळे आग पसरत आहे. अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. सध्या या परिसरामध्ये धुराचे लोट दिसत आहेत. आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन या घटनेची पाहणी केली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी सूचना केल्या. Mumbai Fire: कुर्ला नेहरू नगर येथील रहिवासी सोसायटीत पार्क 20 मोटारसायकल जळून खाक; आग नियंत्रणात.
Fire broke out at the multi-storey Avighna park apartment on Curry Road, around 12 noon today. No injuries reported. pic.twitter.com/W9KqsQLkPr
— ANI (@ANI) October 22, 2021
दरम्यान ट्वीटर वर एका युजरने ट्वीट केलेल्या व्हिडिओ नुसार 19 व्या मजल्यावरून एका व्यक्तीने आगीतून वाचण्यासाठी गॅलरीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयत्न जीववर बेतला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2021 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

