कौतुकास्पद! कोरोना मुळे वडील गमावलेल्या डॉक्टरने कोरोनावर मात करुन तीन वेळा केले प्लाझमा दान
त्यामुळे रुग्णांवर प्लाझ्मा (Plasma) थेरपीचा वापर करुन प्रकृती सुधरल्याचे दिसून आले आहे. तर माहिम मधील नेत्रतज्ञ अजनेय आगाशे यांनी तीन वेळा कोरोनाच्या रुग्णांसाठी प्लाझ्मा दान केले होते
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांवर अद्याप कोणतेच ठोस औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे रुग्णांवर प्लाझ्मा (Plasma) थेरपीचा वापर करुन प्रकृती सुधरल्याचे दिसून आले आहे. तर माहिम मधील नेत्रतज्ञ अजनेय आगाशे यांनी तीन वेळा कोरोनाच्या रुग्णांसाठी प्लाझ्मा दान केले होते. यामुळे शुक्रवारी त्यांना प्रशस्तीप्रत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन नायर रुग्णालयाने गौरवले आले आहे. तर प्लाझ्मा दान करणारे ते 100 वे असल्याचे डॉक्टर जयंती शास्त्री यांनी सांगितले आहे.(Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,21,027 वर)
डॉ. आगाशे यांचे प्लाझ्मा दान करण्यावर ठाम मत होते. तर मे महिन्यात घरातील सहा व्यक्तींसह त्यांचे पालक आणि मुले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी पाच जण यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु वडील हे 89 वर्षांचे असून त्यांना अतिताण, गंभीर आजारी आणि त्यांना रुग्णालयातील उपचाराची गरज होती असल्याचे आगाशे यांनी म्हटले आहे. परंतु रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतरच्या तीन दिवसांनी वडीलांचा मृत्यू झाला.(Coronavirus treatment charges: कोरोना व्हायरस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती)
डॉक्टरांनी पुढे असे म्हटले आहे की, प्लाझ्मा दान केल्यामुळे एखाद्याच्या पालकाला, नातेवाईकाला किंवा मुलाला कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मदत होईल. त्यामुळे जसे मी वडीलांना गमावले तसे त्यांना कोणाला गमावता येणार नाही. आगाशे डॉक्टरांनी कोरोनावर मात केल्याच्या एका महिन्यानंतर पहिल्यांदा 3 जुन रोजी प्लाझ्मा दान केले. तीन महिन्यातून एकदा रक्तदान केले पाहिजे. तर प्लाझ्मा दान केल्यानंतर व्यक्ती पाणी आणि प्रोटीनच Lose करत असून ते पुन्हा 14 दिवसांनी नॉर्मल लेव्हला येते. तर दुसऱ्या वेळेस आगाशे यांच्यासह त्यांच्या 21 वर्षाीय मुलाने सुद्धा जून महिन्याच्या अखेरला प्लाझ्मा दान केले.