मुंबई: कफ परेड येथे 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपी फरार
मुंबईतील (Mumbai) कफ परेड (Cuff Parade) येथील आंबेडरकर नगर मध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईतील (Mumbai) कफ परेड (Cuff Parade) येथील आंबेडरकर नगर मध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींनी बलात्कार केल्यानंतपर पळ काढला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पीडित मुलीली नराधामांनी एका खोलीत घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारामुळे पीडित मुलीच्या आईने पोलिसस्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींची ओखळ पटली असून तीन जणांनी पळ काढला आहे.(मुंबई: वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड परिसरात 29 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू)
सध्या वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनांमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीसुद्धा 4 वर्षीय मुलीवर जवळजवळ 25 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली होती.