CSMT बनले महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक; IGBC कडून मिळाले सुवर्ण प्रमाणपत्र
भारतीय उद्योग संघटनेच्या इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या (IGBC) रेटिंगनुसार सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानकाचा मान मिळाला आहे. भारतीय उद्योग संघटनेच्या इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या (IGBC) रेटिंगनुसार सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल (Sanjeev Mittal), विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल (Shalabh Goel) यांनी आपल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकासह आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमितसिंग अरोरा (Gurmit Singh Arora) यांच्याकडून आयजीबीसीचे प्रमाणपत्र स्वीकारले आहे.
मध्य रेल्वेने आपल्या सीएसएमटी स्थानकात विविध हरित उपक्रम राबविले आहेत. ज्यात रेल्वे स्थानकाच्या क्षेत्रात 15 टक्क्यांहून अधिक झाडे, इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहित करण्यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट्स, सौर पॅनेल, विविध कार्यालये आणि प्रतीक्षालयांमध्ये 17 ओक्युपेंसी सेन्सर, वायफाय, स्वयंचलित तिकिट विक्री यंत्रे, पर्यटन माहिती व बुकिंग सेंटर, फूड कोर्ट, औषधे आणि वैद्यकीय सुविधा, दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासी अनुकूल बनविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पर्यावरणीय परिणामांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी डिजिटल डिस्प्ले यांसारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- Mumbai: नावातील बदलाच्या मागणीनंतर वांद्रे येथील Karachi Bakery बंद करण्यात आल्याचा मनसेचा दावा; बेकरीकडून देण्यात आले 'हे' स्पष्टीकरण
आयजीबीकडून मिळालेल्या प्रमाणपत्रानंतर संजीव मित्तल यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना मध्य रेल्वे क्षेत्रामध्ये अशा उपाययोजना करण्यास प्रोत्साहित केले आहे. याचबरोबर मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुवर्ण प्रमाणपत्र देऊन त्यांच्या प्रयत्नांना मान्यता दिल्याबद्दल त्यांनी आयजीबीसी टीमचे मनापासून आभार मानले आहेत.