मुंबई: आरे कॉलनी येथील नाल्यातून वाहून जाणाऱ्या वृद्धाचा पोलिसांनी वाचवला जीव
मुंबईमधील (Mumbai) आरे कॉलनी येथील नाल्यातून वाहून जाणाऱ्या वृद्धाचा पोलिसांनी जीव वाचवला आहे.
मुंबईमधील (Mumbai) आरे कॉलनी येथील नाल्यातून वाहून जाणाऱ्या वृद्धाचा पोलिसांनी जीव वाचवला आहे. विशाल पाटील असे पोलिसाचे नाव असून त्याने वृद्धाला वाहत्या नाल्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच तातडीने नजीकच्या पोलीस स्थानकात फोन करत या प्रकाराची माहिती दिली.
पाटील या पोलिसाने वृद्ध नाल्यातून वाहत असल्याचे पाहिल्यास लगेच त्यात उडी टाकत त्याला सुखरुप बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. नाल्यातून वाहत जाणाऱ्या व्यक्तीची ओळख हंसराज अशी पटली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(ठाणे: वर्तकनगर येथील गृहसंकुलात मगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)
तसेच हंसराज याला या घटनेनंतर बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या पीडित हंसराजचे कुटुंब नसल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासणीत समोर आले. त्याचसोबत हंसराज हा आरे कॉलनीमधील युनिट 5 येथे राहत असून हा नेमका प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेत आहे.