Mumbai: सेंट्रल रेल्वेकडून मुंबई लोकलध्ये सुरु केली मोफत इंन्फोटेन्मेंट सेवा, प्रवाशांना सिनेमा-टीव्ही शो पाहता येणार
कारण आता प्रवास करताना तुम्हाला सिनेमा, टीव्ही शो किंवा शिक्षणासंबंधित कार्यक्रम मोफत मध्ये पहायला मिळणार आहेत. या संदर्भात रेल्वेने एक विधान सुद्धा जाहीर केले आहे.
Mumbai: मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसठी आनंदाची बातमी आहे. कारण आता प्रवास करताना तुम्हाला सिनेमा, टीव्ही शो किंवा शिक्षणासंबंधित कार्यक्रम मोफत मध्ये पहायला मिळणार आहेत. या संदर्भात रेल्वेने एक विधान सुद्धा जाहीर केले आहे. त्यात असे म्गटले की, मध्य रेल्वेकडून शुगरबॉक्स नेटवर्क मोबाईल अॅपच्या माध्यमातून 'कंन्टेंट ऑन डिमांड' इन्फोटेन्मेंट सेवा देण्यासाठी मैसर्स मार्गो नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सोबत हातमिळवणी केली आहे.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत 165 उपनगरीय लोकल ट्रेनपैकी 10 मध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. सेंट्रल रेल्वे मुंबई आणि आसपासच्या काही लोकल ट्रेनमध्ये ही सध्या सुरु केली आहे. लोकल ट्रेन सर्वाधिक भरवश्याचे साधन असल्याचे मानले जाते. तसेच लोकलच्या तिकिटाचे दर सुद्धा सामान्य आहे. 20 रुपयांच्य तिकिटावर लोक 50 किमी पर्यंतचा प्रवास करतात. वेळेसह पैशांची सुद्धा लोकल ट्रेनमुळे बचत होते.(Maharashtra: लहान किरकोळ विक्रेत्यांकडून वाइन खरेदी करणाऱ्यांना पिण्याचे परमिट लागणार)
Tweet:
मध्य रेल्वेने असे म्हटले आहे की, प्रवाशांना आपल्या उपकरणांना (जसे मोबाईल, लॅपटॉप व टॅबलेट) वर शुगर बॉक्स अॅप डाउनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर मोफत इंन्फोटेन्मेंटचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक दाखल केल्यानंतर एक ओटीपी येईल. यामध्ये असे म्हटले आहे की, यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसणार आहे. तसेच डेटासाठी कोणतेही शुल्क ही भरावा लागणार नाही आहे. म्हणजेच प्रवाशांना मोफत इंटरनेटवर व्हिडिओचा आनंद घेता येणार आहे.