विमानात पॉर्न क्लिप पाहत असल्याप्रकरणी उद्योगपती विरुद्ध महिलेची क्रु सदस्यांकडे तक्रार, आरोपीला अटक
मुंबई (Mumbai) येथून चेन्नईकडे (Chennai) प्रवास करणाऱ्या विमानात एका महिलेच्या मागील सीटवर बसून एक उद्योगपती पॉर्न क्लिप पाहत असल्याचा प्रकार घडला.
मुंबई (Mumbai) येथून चेन्नईकडे (Chennai) प्रवास करणाऱ्या विमानात एका महिलेच्या मागील सीटवर बसून एक उद्योगपती पॉर्न क्लिप पाहत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेने विमानातील क्रु सदस्यांकडे उद्योगपती विरुद्ध तक्रार केली आहे. तसेच विमानात पॉर्न पाहत असल्याप्रकणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
शनिवारी रात्रीच्या वेळी चेन्नईसाठी निघालेल्या विमानात मडीपक्कम येथील महिला तिच्या मुलासोबत प्रवास करत होती. तसेच तिच्या मागील सीटवर मुंबईतील एक उद्योगपती सुद्धा प्रवास करत होता. त्यावेळी या उद्योगपतीने महिलेला दिसेल अशा पद्धताने पॉर्न क्लिप सुरु करुन पाहण्यास सुरुवात केली. मात्र महिलेने संतापून या उद्योगपती विरुद्ध क्रु सदस्यांकडे तक्रार केली.(हेही वाचा-मुंबईत बारबालांवर 47 जणांनी पैसे उधळले, अनाथाश्रमात सर्व पैसे जमा करा - कोर्टाचे आदेश)
यामुळे क्रु सदस्यांनी त्याला दुसऱ्या जागेवर बसण्यास सांगितले परंतु त्याने कोणाचेही ऐकले नाही. तर शेवटी महिलेला दुसऱ्या ठिकाणी बसण्यास क्रु सदस्यांनी जागा करुन दिली. मात्र कॅप्टनने ट्राफिक कंट्रोल रुमला या व्यक्तीच्या अश्लील वागणुकीची माहिती दिली होती. चेन्नई विमानतळावर येताच त्याला सीआरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेतले. परंतु महिलेने उद्योगपती विरुद्ध लेखी तक्रार केली नसून त्याने तिची माफी मागितल्यावर सोडून देण्यात आले आहे.