Mumbai: भाऊबीज निमित्त 100 'लेडीज स्पेशल' बसेस सुरू करण्याचा BEST चा निर्णय

भाऊबीजेचा मुहूर्त साधत

BEST Bus (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) 100 'लेडीज स्पेशल' (Ladies Special) बसेस सुरू करण्याचा निर्णय बेस्टने (BEST) घेतला आहे. भाऊबीज (शनिवार, 7 नोव्हेंबर) पासून या बसेस धावणार आहेत. भाऊबीजच्या निमित्ताने सर्व महिलांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी देऊन त्यांना भेटवस्तू देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ही योजना सुचवली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (Diwali Bonus 2021: BEST कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ठरणार 'बेस्ट'; 20 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर)

शहरातील 27 बस डेपोमधून सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत 100 बसेस 70 वेगवेगळ्या मार्गांवर धावतील, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. ज्या मार्गांवर बसेसमध्ये गर्दी असते असे मार्ग आम्ही निवडले आहेत. लेडीज स्पेशल बसेस या ऑफिसला जाणाऱ्यांना आणि गर्दीच्या वेळेत बसच्या लांब रांगेत थांबणाऱ्या इतर महिलांना दिलासा म्हणून येतील असेही लोकेश चंद्र म्हणाले. त्याचबरोबर या नवीन लेडीज स्पेशल बसेसपैकी जवळपास 90 टक्के बसेस ह्या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असतील. तर उर्वरित नवीन नॉन-एसी सीएनजी बस असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (हे ही वाचा: आजपासून Mumbai International Airport T2 ते दक्षिण मुंबई BEST च्या इलेक्ट्रिक बस प्रवाशांसाठी सुरू)

बेस्टच्या ताफ्यात आधीच 37 महिला विशेष बसेस आहेत. आता ह्या नवीन 100 लेडीज स्पेशल बसेसच्या भरतीनंतर एकूण महिला विशेष बसेसची संख्या 137 वर जाईल. "भविष्यात मागणीनुसार आम्ही महिला विशेष बसेसची संख्या वाढवू. तसंच महिला विशेष बसेसच्या मार्गांची संख्या सुद्धा वाढवली जाऊ शकते," असे चंद्रा म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif