Mumbai: तृतीयपंथींना मुलभूत हक्क मिळण्यासाठी 'किन्नर मा एक सामाजिक संस्थे' च्या प्रतिनिधींनींची राज्यपालांना भेट
तर सध्या कोरोनाच्या काळात तृतीयपंथींना मुलभूत हक्कांसह नागरिकांकडून दिली जाणारी वागणूक पाहता त्यांनी कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेतला.
Mumbai: तृतीयपंथीच्या एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना मुलभूत हक्क मिळावेत अशी मागणी केली आहे. तर सध्या कोरोनाच्या काळात तृतीयपंथींना मुलभूत हक्कांसह नागरिकांकडून दिली जाणारी वागणूक पाहता त्यांनी कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेतला. तृतीयपंथीच्या एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी असे म्हटले की, आम्ही त्यांच्याकडे अन्न, कपडे घर आणि आमचे मुलभूत हक्क मिळावेत याची मागणी केल्याचे किन्नर मा एक सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सलमा खान यांनी ANI ला सांगितले आहे.
सलमा खान यांनी पुढे असे ही म्हटले की, राज्यात 2020 मध्ये आमच्यासाठी एक संगठन सुद्धा बनवण्यात आले आहे. या संगठनेच्या माध्यमातून आमच्या समस्यांचे निवारण होऊ शकते. परंतु ते अद्याप कार्यरत नसल्याचे कोश्यारी यांना सांगितले आहे. यावर कोश्यारी यांनी आमच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल असे खान यांनी सांगितले आहे.(संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर; वनमंत्रीपदासाठी 'ही' नावे चर्चेत)
Tweet:
तर 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने आमच्या समाजासाठी जाहीर केलेल्या निर्णयाची अद्याप राज्यात अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली नसल्याने 1 मार्चला त्या संदर्भात त्यांच्या संस्थेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुद्धा कोश्यारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्याचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिल्याचे सलमा खान यांनी म्हटले आहे.