Mumbai: 68 वर्षाच्या वयोवृद्धाने मुक्या प्राण्यांना केले वासनेची शिकार; तब्बल 30 कुत्र्यांवर बलात्कार, पोलिसांकडून अटक
त्याने कुत्री व मांजरींना खायला देण्याचे लालच दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला आहे. 'बॉम्बे अॅनिमल राइट्स' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित 45 वर्षीय, प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अहमद शाहला डीएन नगर पोलिसांनी अटक केली
याआधी मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार (Rape) झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. आताही मुंबईमधून (Mumbai) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी येथे राहणाऱ्या 68 वर्षीय अहमद शाहने एक-दोन नव्हे तर जवळजवळ 30 कुत्र्यांवर बलात्कार केला आहे. अहमद कुत्र्याशी असे कृत्य करत असताना एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनविला, त्याच आधारावर अहमद शाहवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी अहमद शाह याला पोलिसांनी अटक केली आहे. जेव्हा हे प्रकरण माध्यमांसमोर आले तेव्हा सोशल मीडियावर पिडीत कुत्र्यांना न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली.
आरोपी अहमद शाह हा जुहू गल्लीत राहणारा भाजी विक्रेता आहे. त्याने कुत्री व मांजरींना खायला देण्याचे लालच दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला आहे. 'बॉम्बे अॅनिमल राइट्स' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित 45 वर्षीय, प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अहमद शाहला डीएन नगर पोलिसांनी अटक केली. विजय मोहनानी यांना स्थानिक व्यक्तीने फोन करून एक व्यक्ती भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करत असल्याची माहिती दिली होती. त्याने पुरावे म्हणून डिसेंबर 2020 चा एक व्हिडिओ पाठविला होता, तो पाहून विजय मोहनानी यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी डीएन नगर पोलिस ठाण्यात याची नोंद केली. (हेही वाचा: बकरी सोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महागात; रागाच्या भरात शेळीने केला हल्ला, पहा व्हिडिओ)
या प्रकरणात वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले की, शाह याला मंगळवारी रात्री घरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी, पोलिसांनी आयपीसी कलम 377 (अनैसर्गिक गुन्हा), 429 (एखाद्या प्राण्याची हत्या करणे किंवा त्याला अपंग बनवणे) आणि कलम -11 अंतर्गत मंगळवारी, 9 मार्च रोजी एफआयआर दाखल केला. पोलिसांनी असे म्हटले आहे की आरोपीला अशा प्रकारचे दुष्कृत्य करण्याची सवय आहे आणि याआधी स्थानिक लोकांनी त्याला अनेकवेळा समजही दिली होती.