मुंबईतील ओशिवरा स्थित असलेल्या हुक्का पार्लवर टाकण्यात आलेल्या धाडीत 69 जणांना अटक

अटक करण्यात आलेले हे सर्वजण हुक्का पार्लरमधील कस्टमर्स असल्याचे सांगण्यात आले आहे.

Hookah Party | (Photo Credits: Pixabay)

ओशिवरा (Oshiwara) येथे रविवारी पोलिसांनी एका हुक्का पार्लवर धाड टाकरत 69 जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले हे सर्वजण हुक्का पार्लरमधील कस्टमर्स असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी हुक्का पार्लरचा मालक आणि तीन वेटर्स सुद्धा धाड टाकली त्यावेळी तेथे उपस्थितीत होते. या प्रकरणी 28 महिलांची सुटका करण्यात आल्याचे ही पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी हुक्का पार्लवर ही धाड पहाटेच्या 3.30 वाजता टाकली आहे.(नवी मुंबई: ई-पाससाठी बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक) 

पोलिसांना सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही जणांनी मास्क घालून हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत आहेत. ही पार्टी सुरु असताना एका विचित्र पद्धतीने तेथे काही गोष्टी घडत असल्याचे ही पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास केला असता पार्टी ठेवणाऱ्या व्यक्तीने सर्वांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पार्टीला येण्याचे आमंत्रण दिले होते. ताब्यात घेण्यात आलेल्यांनी लॉकडाऊनच्या नियमांसह हुक्का ओढणे हे बेकायदेशीर असल्याचा नियम मोडला आहे.

तर काही दिवसांपूर्वी ठाणे येथील माजिवाडा नाक्यावर असलेल्या कॅपिटल हॉटेलमध्ये हुक्का पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला होता. मुख्य बाब म्हणजे हे हॉटेल ठाणे पोलिसांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून तयार करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाई केली. 12 जणांवर पोलिसांकडून कारवाई केली गेल्याची माहिती देण्यात आली होती.(Coronavirus in Maharashtra: कोरोना व्हायरसचे तुमच्या जिल्ह्यात किती आहेत रुग्ण; जाणून घ्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आकडेवारी)

दरम्यान, सध्या कोरोना व्हासरने थैमान घातल्याने दिवसागणिक वेगाने रुग्णांसह बळींच्या आकड्यात भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड वॉरिअर्स सुद्धा आपला जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावताना दिसून येत आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारने काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु  नियम आणि अटींचे पालन करावे अशा सुचना सुद्धा दिल्या आहेत.