Mumbai: 50 वर्षीय व्यक्तीचा 5 मुलींवर 3 वर्षे बलात्कार; ड्रिंक्स देऊन केले लैंगिक अत्याचार, चित्रीकरणही केले 

मुलीच्या म्हणण्यानुसार, फिरोज खानने मुलींना ड्रिंक्स देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आणि यासाठी अनेकदा त्यांना बिअर पिण्यास भाग पाडले. त्याने लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरणही केले आणि व्हिडिओ क्लिप त्याच्या मित्रांना पाठवल्या

Mumbai: 50 वर्षीय व्यक्तीचा 5 मुलींवर 3 वर्षे बलात्कार; ड्रिंक्स देऊन केले लैंगिक अत्याचार, चित्रीकरणही केले 
Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

2019 मध्ये वेश्याव्यवसायातून (Prostitution) सुटका करण्यात आलेल्या एका किशोरवयीन मुलीने नुकतेच तिच्यावर आणि तिच्या बहिणींवर एक पुरुषाकडून वारंवार बलात्कार (Rape) झाल्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पूर्व मुंबईतील चेंबूर (Chembur) येथील एका 50 वर्षीय व्यक्तीला मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सुटका करण्यात आलेल्या या 17 वर्षीय मुलीने तेव्हापासून अभ्यासाला सुरुवात केली आहे. तिने बालगृहातील समुपदेशकांना सांगितले की, फिरोज खानने तिच्यावर आणि इतर चार तरुण मुलींवर लैंगिक अत्याचार केले. यातील 15, 13 आणि 11 वर्षांच्या तिघी तिच्या बहिणी आहेत.

फिरोज खान याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती झोन 6 चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी सांगितले की, खानला मंगळवारी रात्री चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी विशेष पॉक्सो कोर्टात हजर करण्यात आले आणि कोठडीत चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली गेली. ही घटना चेंबूरच्या अशोक नगर आणि इंदिरा नगर भागात 2018 ते 2021 दरम्यान घडली.

मुलीने दिलेल्या माहितीनंतर बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने इतर अल्पवयीन मुलींना निवारगृहात बोलावून त्यांचे समुपदेशन केले. त्यांनी सुमारे तीन वर्षे आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर शेल्टर होम प्राधिकरणाने याबाबत आरसीएफला माहिती दिली. पोलीस आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, आरोपी अटकेत)

मुलीच्या म्हणण्यानुसार, फिरोज खानने मुलींना ड्रिंक्स देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आणि यासाठी अनेकदा त्यांना बिअर पिण्यास भाग पाडले. त्याने लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरणही केले आणि व्हिडिओ क्लिप त्याच्या मित्रांना पाठवल्या. मुलींनी बाल संगोपन अधिकाऱ्यांना असेही सांगितले की, आरोपींनी त्यांना पॉर्न पाहण्यास भाग पाडले आणि नंतर त्यांचे लैंगिक शोषण केले. यासोबत त्याने पैशाच्या बदल्यात मुलींना त्याच्या मित्रांकडे लैंगिक कृत्यांसाठी पाठवून देह व्यापार करण्यास भाग पाडले.

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 09:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).