Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधिमंडळात महत्त्वाची अपडेट
अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment: विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) च्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फडणवीसांनी महायुती सरकार कडून कोणतीही योजना बंद केली जाणार नाही याची ग्वाही दिली आहे. सोबतच राज्यातल्या महिला डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याचंही उत्तर दिलं आहे. दरम्यान फडणवीसांनी आज विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना चे निकष बदलणार का?
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना मध्ये निकष बदलणार का? असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी चूकीच्या पद्धतीने कोणी पैसे घेत असल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुलीच्या नावे पैसे घेणारे पुरूष, एकापेक्षा अधिक अकाऊंट्स द्वारे पैसे घेणारे लाभार्थी यावर सहाजिकच कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. नक्की वाचा: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झाला नाही; सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीबाबत राज्य सरकारचे स्पष्टीकरण .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रूपये दरमहा मिळत होते. वचननाम्यामध्ये ही रक्कम 2100 केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता नव्या रक्कमेचा हफ्ता कधी मिळणार याची देखील महिलांना उत्सुकता आहे. दरम्यान आर्थिक तरतूद करूनच हफ्ता वाढवला जाऊ शकतो त्यामुळे 2100 साठी अजून काही महिने महिलांना वाट पहावी लागेल असा अंदाज आहे.