MSRTC Bus Fare Hike: दिवाळीत एसटीने 21-31ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणार्‍यांना मोजावे लागणार अधिक भाडे

21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान प्रवासासाठी ही तात्पुरती भाडेवाढ लागू असणार आहे. 1 नोव्हेंबर पासून पुन्हा जुने दर लागू केले जातील.

ST Bus | (Photo Credits: MSRTC)

दिवाळीच्या (Diwali) सणात तुम्ही एसटी ने गावी जाण्याच्या विचारात असाल तर तुम्हांला थोडे जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवा. कारण यंदा दिवाळीच्या दिवसात एसटीने तात्पुरती भाडेवाढ (MSRTC Bus Fare Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बसच्या दरात 10% वाढ केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान भाडेवाढीमधून शिवनेरी (Shivneri) आणि अश्वमेध (Ashwamedh) या गाड्यांना सूट देण्यात आली आहे. 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान प्रवासासाठी ही तात्पुरती भाडेवाढ लागू असणार आहे. 1 नोव्हेंबर पासून पुन्हा जुने दर लागू केले जातील.

टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना MSRTC च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाकडून 30% भाडेवाढी मंजुरी मिळाली आहे. दिवाळी सारखा काळ पाहता मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडतात. यामध्ये ऑर्डनरी, सेमी लक्झरी, शिवशाही आणि स्लिपर बस यांच्या तिकीटांच्या दरांत वाढ केली जाणार आहे. यंदाच्या वर्षी फक्त 10% दरवाढ केली जाणार आहे. तर मुंबई-पुणे दरम्यान धावणारी शिवशाही सारख्या प्रिमियम बस यांच्यात दरवाढ होणार नाही. हे देखील नक्की वाचा: ST Employee Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर.

दिवाळी मध्ये खाजगी बस सेवा देणार्‍यांनी तिकीटांचे दर दुप्पट केले आहेत. यामध्ये मुंबई-गोवा, महाबळेश्वर, उदयपूर यांचा समावेश आहे. ही दिवाळीच्या दिवसात पर्यटकांनी हाऊसफुल्ल असणारी ठिकाणं आहेत.

पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर दोन दिवसापूर्वी रात्री मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असल्याने चाकरमान्यांना त्यांच्या इश्चितस्थळी पोहचण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने ताटकळत रहावं लागत आहे. त्यांचं वेळापत्रक कोलमडल्याचं पहायला मिळाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif