MPSC Exam 2021: 'एमपीएससी' च्या पेपरपूर्वी दीड तास केंद्रावर उमेदवारांना उपस्थितीत राहण्याच्या सुचना अन्यथा अपात्रत ठरविले जाणार
त्याचसोबत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा 27 मार्चला होणार असून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे.
MPSC Exam 2021: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेची पूर्व परीक्षा येत्या 14 मार्चला पार पडणार आहे. त्याचसोबत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा 27 मार्चला होणार असून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आयोगाकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, परीक्षेच्या पेपर पूर्वी उमेदवारांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा त्यांना अपात्र ठरवले जाईल असा इशारा दिला गेला आहे.
उमेदवारांना कोणत्याही पद्धतीची अडचण असल्यास त्यांनी 1800-1234-275 आणि 1800-2673-889 या टोल फ्री क्रमांकावर संपर्र करावा असे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत उमेदवाराचा फोन रेकॉर्ड केला जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर जाणून घ्या आयोगाने कोणत्या सूचना उमेदवारांना दिल्या आहेत.(Indian Railway ने जारी केला नवीन Helpline Number; प्रवासादरम्यान तक्रार, चौकशी, मदतीसाठी 'या' एकाच नंबरवर कॉल करा)
- मूळ प्रवेश पत्राशिवाय उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षा सुरु होण्यापूर्वी दीड तास आधी येणे अनिवार्य असणार आहे.
-परीक्षेसाठी उशिरा आलेल्या उमेदवाराला अपात्र ठरविले जाणार आहे.
-आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड पैकी एक काहीतरी हे ओळखपत्राच्या आधारावर घेऊन घेणे अत्यावश्यक असणार आहे.
-परीक्षेसाठी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. त्याचसोबत मित्रांसह नातेवाईकांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही आहे.
-परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच अद्याप सुद्धा काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. अशातच आता एमपीएससीच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी परीक्षेला येताना स्वत:चे ओळखपत्र आणि परीक्षापत्र घेऊन येणे अत्यावश्यक असणार आहे.