MNS Padwa Melava: उद्या मुंबईमध्ये होणार मनसेचा पाडवा मेळावा; गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये केले बदल, घ्या जाणून

या पार्श्वभुमीवर दुपारी 2 ते मध्यरात्री या कालावधीत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत

Raj Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) गुढीपाडव्यानिमित्त 'पाडवा मेळाव्या’चे (Padwa Melava) आयोजन केले असल्याने, शनिवारी मध्य मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी सांगितले की, या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अभ्यागत येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गर्दीने गजबजलेले असतील. या पार्श्वभुमीवर दुपारी 2 ते मध्यरात्री या कालावधीत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे हे शिवाजी पार्कवरील सभेतून मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

या सभेनिमित्त वाहतुकीमध्ये खालीलप्रमाणे बदल असतील-

या ठिकाणी वाहनांना प्रवेश नाही-

- एसव्हिएस रोड सिद्धिविनायक मंदिर जंक्शन पासून कापड बाजार जंक्शन पर्यंत

- लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्गावर पांडुरंग नाईक मार्गावरील जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी (हेही वाचा: 'मेट्रोची कामे आम्ही सुरू केली होती', भाजपचा शिवसेनेवर निशाणा; शहरात झळकले 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' चे बॅनर्स)

- गडकरी चौक जंक्शनपासून केळुस्कर रोड, दक्षिण, दादरपर्यंत

- सेनापती बापट पुतळ्यापासून दादासाहेब रेगे मार्गापर्यंत

- पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन पासून बाल गोविंददास मार्ग एलजे मार्ग, माहीम पर्यंत

या ठिकाणी  गाडी उभी करण्यास मनाई आहे- 

- एसव्हिएस रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते एमबी राऊत रोड)

- केळुस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर), दादर

- एमबी राऊत मार्ग (एसव्हीएस रोडच्या जंक्शनपासून), दादर

- पांडुरंग नाईक मार्ग (एमबी राऊत रोड), दादर

- दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळ्यापासून गडकरी जंक्शनपर्यंत), दादर

- लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्र. 4 पासून शितलादेवी मंदिर जंक्शनपर्यंत)

- एनसी केळकर मार्ग (गडकरी जंक्शनपासून हनुमान मंदिर जंक्शनपर्यंत), दादर

दरम्यान, दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे त्यामुळे या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी राज ठाकरे कदाचित आपल्या दौऱ्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.