MLC Election 2022: पंकजा मुंडे यांचा पत्ता कट, भाजपने विधानरिषद नाकारण्याची काय कारणे असू शकतात?

यात पाचही नावांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पक्षाने पुन्हा एकदा डावलल्याची चर्जा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Pankaja Munde | (Photo Credit - Facebook)

विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात पाचही नावांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पक्षाने पुन्हा एकदा डावलल्याची चर्जा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्तेही तशीच भावना व्यक्त करत आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा एकदा डावलण्याची नेमकी काय कारणे असू शकतात? याबाबत राजकीय वर्तुळातूनच अनेकदा चर्चा झाली आहे. तिच चर्चा आजही पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. याच चर्चा आणि कारणांवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.

भाजपने उमेदवारी दिलेले उमेदवार

निवृत्त होत असेले आमदार

पार्श्वभूमी

पंकजा मुंडे यांना विधान परिषद 2019 मध्ये त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्या काहीशा नाराज झाल्या. त्याहीपेक्षा हा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी अधिक लागला. त्यामुळे त्यानंतर झालेल्या विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये पंकजा मुंडे यांना पक्षाने संधी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. राज्याचे नेतृत्व हाती असलेल्या आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना हे शक्य होते. मात्र तसे घडले नाही. केंद्रीय नेतृत्वाकडे बोट दाखवत हा निर्णय आपला नसल्याचे तेव्हा महाराष्ट्र भाजप नेत्यांनी सांगितले. त्या वेळी पक्षाने 21 मे 2020 रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना संधी दिली. दुसऱ्या बाजूला विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या अनेकांचा पत्ता कापला. पुढे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला. (हेही वाचा, एकनाथ खडसे भाजपला नकोच आहेत का? राज्यसभा उमेदवारीवरुन नव्या चर्चेला फुटले तोंड)

पुनर्वसन

एकनाथ खडसे यांनी तर पक्ष सोडला. नंतर मग विनोद तावडे यांना राज्यपाल पद देण्यात आले. पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे पक्ष प्रभारी करण्यात आले. अशा प्रकारे त्यांचे पुनर्वसन करण्यात आले तरी त्यांना महाराष्ट्रात मात्र कुठेच शिरकाव करता येणार नाही अशी दक्षता घेण्यात आली.

पंकजा मुंडे यांना का डावलले?

फडणविसांच्या राजकारणाला धक्का?

राजकीय जाणकार सांगतात की पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा लाभला आहे. सहाजिकच पंकजा यांच्याकडे नेतृत्व म्हणूनच पाहिले जाते. त्यात त्यांचा ओबीसी प्रश्नांची जाण आणि अभ्यास आहे. त्यांना जनतेतूनही मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आता त्यांना विधानपरिषद दिली तर त्या अधिक आक्रमक होतील. परिणामी देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची थेट स्पर्धा होईल. तसे झाले तर फडणवीस यांच्या राजकारणाला फटका बसेल. त्यामुळेच ही दक्षता घेण्यात आली असावी.

भाजपमध्ये मास लिडरचा अभाव

भारतीय जनता पक्षात आलेले बहुतांश नेते हे आरएसएसच्या मुशीत तयार झालेले असतात. त्यांचे संघटन कौशल्य चांगले असते. पण ते पडद्यावर येऊन काम करेपर्यंत कोणालाच माहिती नसतात. जेव्हा ते पडद्यावर येतात तेव्हा ते जनतेला कळतात. पण त्यातून त्यांची 'मास लिडर' अशी प्रतिमाच होत नाही. आजही भाजपमध्ये मास लिडर म्हणावेत असा अपवाद वगळता एकही नेता नाही. पंकाज मुंडे या मास लिडर आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. परिणामी त्यांचे पुनर्वसन केले तर महाराष्ट्र भाजपावर त्यांचा मोठा प्रभाव निर्माण होईल. परिणामी राज्यातील विद्यमान भाजप नेत्यांसमोर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा टाळण्यासाठी दिल्ली नेतृत्वाने हा निर्णय घेतलेला असू शकतो, अशी चर्चा आहे.