Suicide Due to Menstrual Cycle Pain: मासिक पाळीच्या वेदना असहाय्य, अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मुंबई येथील घटना

तिला प्रथमच मासिक पाळी (First Menstrual Period) आली होती. धक्कादायक म्हणजे पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना (Menstrual Cycle Pain) आणि शारीरिक बदल यामुळे ती प्रचंड तणावात होती.

Suicide and Menstrual Cycle Pain | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई (Mumbai) येथील मालाड परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. तिला प्रथमच मासिक पाळी (First Menstrual Period) आली होती. धक्कादायक म्हणजे पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना (Menstrual Cycle Pain) आणि शारीरिक बदल यामुळे ती प्रचंड तणावात होती. या तणावातूनच तिने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती पुढे येत आहे. वय वर्षे अवघे 14 असलेही ही मुलगी मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि वेदना यांमुळे प्रचंड तणावात होती. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्येतून तिने राहत्या घरी आत्महत्या केली. घरात एकटीच असताना तिने लोखंडी सळीला गळफास घेऊन आयुष्य संपवीले. ही घटना मंगळवारी (26 मार्च) रोजी घडली. पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.

पोलिसांनी आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांचा जबाबद नोंदवला. जबाबादरम्यान पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी तिच्या आईवडीलांसोबत मालाड येथील मालवणी परिसरातील खारोडी येथे राहात होती. अलिकडेच तिला मासिक पाळी आली होती. आयुष्यात मासिक पाळी सारख्या नैसर्गिक प्रक्रियेला ती प्रथमच सामोरी जात होती. त्यामुळे दरम्यानच्या काळात उद्भवणाऱ्या शारीरिक आणि मानसीक बदलांना सामोरे जाताना ती प्रचंड तणावात होती. दरम्यान, आम्ही घरात नसताना तिने गळफास घेतल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले. (हेही वाचा, Murder Due to Menstruation: मासिक पाळीचे रक्त पाहून भावाच्या मनात शरीरसंबंधाचे भूत; अंगावर चटके देऊन बहिणीची हत्या)

दरम्यान, लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुलीने आत्महत्या केली. घडला प्रकार लक्षात येताच तिच्या पालकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी तिच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ती बेशुद्ध अवस्थेत असतानाच तिला कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सायंकाळी सव्वासात वाजणेच्या सुमारास तिला मृत घोषीत केले. (हेही वाचा, Health Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video)

मुलीच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच मालवणी पोलीस घटनास्थली दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आणि कायदेशीर प्रक्रिया सुरु केली. पोलिसांनी मुलीचे पालक आणि डॉक्टरांचाही जबाब नोंदवून घेतला. पालकांनी जबाबदरम्यान सांगितले की, तिला प्रथमच मासिक पाळी आली होती. या वेळी तिला प्रचंड त्रास होत होता. त्यातून ती खचली होती आणि मानसिक तणावात होती. त्यातूनच हा तणाव आणि वेदना असहाय्य झाल्याने तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला असावा, अशी शक्यता पालकांनी व्यक्त केली. पालकांच्या जबाबावरुन पोलिसांनी आपमृत्यूची नोंद केली आहे. (हेही वाचा, महिलांनो आता मासिक पाळीच्या काळात रहा कंफर्टेबल; Pads ऐवजी वापरा Period Panties)

मासिक पाळी ही अपवाद वगळात प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अटळ प्रक्रिया असते. प्रत्येक स्त्रीला वयाच्या विशिष्ट टप्प्यावर निसर्गनियमानुसार त्याला सामोरे जावे लागतेच. हे सामोरे जाणे स्वीकारताना अनेक महिलांना वेदना आणि त्या काळात उद्भवणाऱ्या शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र, महिलंना निसर्गत:च या वेदना सहन करण्याची शक्ती मिळाल्याने त्या निभावून नेतात. काही महिला मात्र याला अपवाद ठरतात. त्यांना प्रचंड आणि असहाय्य वेदना होता. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आणि योग्य समुपदेशन होणे तसेच, कुटुंबीयांकडूनही आवश्यक सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे, वैद्यकीय सल्लागार सांगतात.