Maharashtra Political Crisis: लाखो शिवसैनिक आदेशाच्या प्रतिक्षेत, बंडखोर शिवसेना आमदारांना संजय राऊत यांचा सूचक इशारा
गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या आमदारांवर इशारा देत त्यांनी ट्विट केले की, 'गुवाहाटीत किती दिवस लपून बसणार, चौपाटीवर यावे लागेल...'
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय संकट वाढत आहे. शिवसेनेत (Shiv Sena) सुरू असलेल्या खलबतेदरम्यान भाजपही सक्रिय झाले आहे. दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गुवाहाटी येथे पोहोचलेल्या आमदारांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांनी आमदारांना अनेकदा इशाराही दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत त्यांच्या एका ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या आमदारांवर इशारा देत त्यांनी ट्विट केले की, 'गुवाहाटीत किती दिवस लपून बसणार, चौपाटीवर यावे लागेल...' वास्तविक, आमदारांच्या बंडखोरीनंतर संजय राऊत सातत्याने आमदारांना मुंबईत येण्यास सांगत आहेत. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने दिली Y+ श्रेणीची सुरक्षा)
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जनता विश्वास ठेवेल. काल ते जे बाहेर गेले आहेत त्यांनी शिवसेना हे नाव वापरू नये आणि बापाचे नाव वापरावे आणि मते मागावीत. त्यांना जे करायचे ते करू द्या, मुंबईला यायचे आहे, नाही का? तिथे बसून तुम्ही आम्हाला काय सल्ला देत आहात? लाखो शिवसैनिक आमच्या एका इशाऱ्याची वाट पाहत आहेत, पण तरीही आम्ही संयम बाळगला आहे.
यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेला कोणीही हायजॅक करू शकत नाही, असे म्हटले होते. शिवसेना हा खूप मोठा पक्ष आहे. शिवसेनेला सहजासहजी हायजॅक करता येत नाही. शिवसेनेला पैशाने तोडता येणार नाही. शिवसेनेला बनवण्यासाठी लोकांनी त्याग केला आहे. त्यांनी आपले रक्त सांडले आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मंगळवारपासून बंडखोरीचे सूर उमटू लागले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार सुरतला पोहोचले होते, त्यानंतर ते आसाममधील गुवाहाटीला पोहोचले. तेव्हापासून शिवसेनेचे आमदार एकामागून एक गुवाहाटी येथे पोहोचत आहेत. शिंदे गटाचा दावा आहे की, त्यांना 38 आमदारांचा पाठिंबा आहे.