MHT CET 2020: कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढील सूचनेपर्यंत Common Entrance Test संबंधित सर्व परीक्षांना स्थगिती, उदय सामंत यांची माहिती
महाराष्ट्र CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या परीक्षांबाबत एक महत्वाचा निर्णय राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्य सरकारने अद्याप 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षांचे निकाल सुद्धा जाहीर केलेले नाहीत. त्याचसोबत अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या परीक्षांबाबत एक महत्वाचा निर्णय राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.
उदय सामंत यांनी असे म्हटले आहे की, COVID19 चा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. यामध्ये CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात त्या सुद्धा आता स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परीक्षांबाबतच्या नव्या तारखा भविष्यात सांगण्यात येतील असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.(Maharashtra SSC & HSC Results 2020 Date: 10,12 वीच्या निकालासाठी आणखीन महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा? 'ही' असू शकते निकालाची तारीख)
तर काही दिवसांपूर्वीच युजीसीने एक अहवाल जाहीर करत देशभरात विद्यापीठांच्या परीक्षांच्या वेळापत्रकासाठी गाईडलाईंस जारी केल्या होत्या. त्यानुसार आता हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. अंतिम वर्गाची अंतिम सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेड आणि मार्क्स मेंटेन करण्यासाठी विशेष गुणपद्धती दिली जाईल. पुढील वर्षी ग्रेडिंग सुधारण्यासाठी विशेष परीक्षा पुढल्या वर्षी घेतल्या जातील. मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई विद्यापीठामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्यांचे सर्वोत्तम मार्क निवडून ग्रेडिंग ठरवलं जाईल. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार होईल असे सांगण्यात आले होते.