पश्चिम मार्गावर आज रात्री ब्लॉक तर मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक आहे.

Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक आहे. त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकावर जलद मार्गावरील स्थानकाअभावी थांबा नसेल. तर हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल मार्गावर विशेष सेवा चालविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ पर्यंत माटुंग्याहून कल्याण दिशेकडे जाणारी लोकल मुलुंडपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच जलद मार्गावर अतिरक्ति स्थानकांअभावी ब्लॉकवेळेत या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वे ट्विट - 

हेही वाचा - Mumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर मंकी हिल ते कर्जतदरम्यान महिनाभर मेगाब्लॉक; 22 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

या लोकल होणार रद्द -

मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. वडाळा रोड ते वाशी दोन्ही दिशेकडील लोकल सकाळी ११.१० ते ३.४० वाजेपर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.१६ पर्यंत सीएसएमटी ते वाशी-बेलापूर-पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. तसेच सकाळी १०.१७ ते दुपारी ३ पर्यंत पनवेल-बेलापूर-वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालू राहतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर २ आणि ३ नोव्हेंबर रोजी रात्रीकालीन ब्लॉक असणार आहे. रात्री १२.३५ ते पहाटे ३.३५ पर्यंत वसई रोड फलाट क्रमांक ७ वर साडे तीन तासांचा ब्लॉक असेल. याच दिवशी रात्री १२.४५ ते पहाटे ४.१५ पर्यंत वसई रोड फलाट क्रमांक ६ वर ब्लॉक असेल. यावेळी रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करण्यात येईल.