Mega Block : तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या धीम्या तर पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या धीम्या तर पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर आज सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

Mumbai local | (Archived and representative images)

Mumbai MegaBlock :  मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकलला रविवारी मात्र थोडा ब्रेक मिळतो. त्यामुळे मुंबईकरांना मेगाब्लॉकचं गणित सांभाळूनच रविवारच्या दिवशी प्रवास करावा लागतो. आज ( 6 जानेवारी) दिवशी मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या धीम्या तर पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर आज सकाळी 11  वाजल्यापासून दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे आज घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या मेगाब्लॉकचं गणित पाहूनच पुढील प्रवास ठरवा.

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर कसा आहे मेगाब्लॉक?

मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर आज मेगाब्लॉक आहे.

वेळ - स. ११.१० ते दु. ३.४०

मेगा ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे मार्गावर आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे या मार्गावर मेगाब्लॉक असेल. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.

वेळ - स. ११.४० ते दु. ४.१०

मेगा ब्लॉक दरम्यान हार्बर लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी कुर्ला (फलाट-८) - पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या तिकीट-पासवरून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून सकाळी १० ते ६पर्यंत प्रवास करता येईल.

सांताक्रूझ ते माहीम या स्थानकादरम्यान आज अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक आहे.

वेळ - स. १०.३५ ते दु. ३.३५

मेगाब्लॉकच्या दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

आज घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या मेगाब्लॉकचं गणित पाहूनच पुढील प्रवास ठरवा.