Mumbai: कमी गुण मिळाल्याने MBBS च्या विद्यार्थ्याची राहत्या घरी आत्महत्या; कांदिवली येथील घटना

सतत कमी गुण मिळाल्याने हताश झालेला जांगीड गेल्या दोन महिन्यांपासून घरीच होता. अजयचे वडील कंत्राटदार म्हणून काम करतात.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

MBBS Student Commits Suicide: कमी शैक्षणिक गुणांमुळे नैराश्यात आलेल्या 22 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याने शुक्रवारी कांदिवली (Kandivali) पश्चिमेच्या राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केली. अजय जांगीड असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो लातूर येथील विलासराव देशमुख महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सतत कमी गुण मिळाल्याने हताश झालेला जांगीड गेल्या दोन महिन्यांपासून घरीच होता. अजयचे वडील कंत्राटदार म्हणून काम करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला शुक्रवारी त्याची मार्कशीट मिळाली, ज्यामध्ये त्याला पुन्हा निराशाजनक निकाल दिसून आला. सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेच्या वेळी, घरी फक्त त्याची आई होती, ती स्वयंपाकघरात व्यस्त होती. जेव्हा ती हॉलमध्ये आली तेव्हा तिचा मुलगा पंख्याला स्कार्फ बांधून लटकलेला पाहून तिला धक्काच बसला. (हेही वाचा -Mumbai News: CSMT रेल्वे स्थानकावर संतापजनक घटना, महिलेचा लैंगिक छळ; रेल्वे कर्मचाऱ्याचा खोटा दावा करणाऱ्याला अटक)

अजयला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले. पोलीस उपायुक्त (झोन-11) आनंद भोईटे यांनी सांगितले की, घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. (वाचा - Prank Turns Ugly in Nagpur: सोशल मीडीयात रील साठी अपहरणाचा प्रॅन्क व्हिडीओ शूट करणं 4 मुलांना पडलं महागात!)

तथापी, प्राप्त माहितीनुसार, अजय हा नैराश्यावर औषधोपचार करत होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून तो जास्तचं नैराश्यात होता. त्याच्या कमी मार्कांबद्दल त्याने त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली होती. त्याचा एक लहान भाऊ जयपूरमध्ये शिकत आहे. या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या संबंधित कलमांतर्गत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif