Matrimonial Fraud Case in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये 40 मुलींची फसवणूक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात; मेट्रोमॅनी साईट वर फसवणूक

दोन पुणे (हडसपार आणि भोसरी) आणि खारघर, विलेपार्ले, घाटकोपर आणि खालापूरमध्ये प्रत्येकी एक आहे.

Representative Image (Photo Credits- Pixabay)

महाराष्ट्रामध्ये एका 'लुटारू वरा' ने 40 जणींना फसवल्याचा एक प्रकार समोर आला आहे. मुलींची फसवणूक करणारा हा माणूस 43 वर्षीय आहे. त्याने मुलींची फसवणूक करून 30-40 जणींची फसवणूक केली आहे. या पुरूषाचे नाव Feroze Ahmad Niyaz Shaikh आहे. त्याने मेट्रोमॅनी साईट (Matrimonial Fraud) वर फिरोझ शेख आणि विनय राजपूत अशी दोन प्रोफाईल बनवली आहेत. त्याने घटस्फोटित हिंदू, मुस्लिम मुलींना आपल्या जाळ्यात खेचले. यावेळी त्याने काहींना आपण बॅंकर, पायलट असल्याचं सांगितलं.

मिड डे च्या रिपोर्ट्सनुसार, फिरोझ ला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. श्रीमंत मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने आपण पायलट किंवा आरबीआय मध्ये सिनियर बॅंकर असल्याचं म्हटलं. त्याने आपण श्रीमंत असल्याचं भासवलं होतं. जेव्हा या मुली महागडे दागिने परिधान करत असे तेव्हा त्याने ते या मुलींना काढायला सांगून त्याची चोरी केली होती.

काही वेळा, फिरोज महिलांना त्याच्या भाड्याच्या वाहनातून सलूनमध्ये घेऊन जायचा, त्यांना त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्याची विनंती करायचा आणि नंतर नजरेतून गायब व्हायचा. तपास अधिकारी पीएसआय हर्षल राऊत म्हणाले, "फिरोजने विदेशी नागरिकांसह महिलांना प्रभावित करण्यासाठी महागड्या कार आणि मॅकबुक खरेदी करून त्याच्या योजनांद्वारे लक्षणीय संपत्ती जमा केली."

बहुतेक मुली या 30 किंवा 40 शी मधील आहेत. 23 जुलै रोजी एका 38 वर्षीय नालासोपाऱ्यातील महिलेने फिरोजविरोधात तक्रार दाखल केल्याच्या दिवसापर्यंत त्याने सुमारे 40 महिलांची फसवणूक केली होती. पोलिसांना आढळले की त्याने भारतभरातील अनेक महिलांची फसवणूक केली आहे. बनावट प्रोफाइलमुळे त्याला कल्याणमध्ये अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी क्रेडिट आणि डेबिट कार्ड, मोबाईल फोन, दागिने, एक कार आणि एक मॅकबुक जप्त केले. अर्नाळा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी त्याला जबलपूरला हलवण्यात येणार आहे. Fraud For Marriage: मनासारखा जोडीदार शोधण्याच्या नादात Matrimony Site वरुन महिलेची 2.77 लाख रुपयांची फसवणूक. 

फिरोज विरूद्ध सहा एफआयआर आहेत. दोन पुणे (हडसपार आणि भोसरी) आणि खारघर, विलेपार्ले, घाटकोपर आणि खालापूरमध्ये प्रत्येकी एक आहे. 2016 मध्ये त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली, त्याने सहा वर्षे तुरुंगवास भोगला. सुटकेनंतर त्याने घटस्फोटित महिलांची फसवणूक सुरू केली.