Maratha Reservation: याचिकाकर्त्याचा चक्क खंडपीठालाच विरोध,सुनावणीवर 14 जानेवारीला तोडगा निघणार?

मात्र याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ही सुनावणी न्यायाधाश रणजीत मोरे यांनी करु नये अशी मागणी केली आहे.

मराठा आरक्षण (Photo Credit: Wiki Commons )

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत दाखल झालेल्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी करण्यात येणार होती. मात्र याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ही सुनावणी न्यायाधीश रणजीत मोरे यांनी करु नये अशी मागणी केली आहे.

राज्य सरकार दिलेल्या मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर न करु शकल्याने मुदतवाढीसाठी न्यायालयात अर्ज सागर करण्यात आला आहे. परंतु रणजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे वर्ग कराव्यात हा मुद्दा छरुन ठेवला गेला. मात्र सदावर्ते यांनी या मुद्द्यावर आक्षेप घेतला. तसेच 2018 मध्ये रणजीत मोरे यांनी दाखल झालेल्या याचिकावर आक्षेप घेतल्याने ते कसे या बद्दल सुनीवणी करणार असा प्रश्न शुक्रवारी न्यायालयासोर मांडला.(हेही वाचा-Maratha Reservation : मराठा आरक्षण याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात 23 जानेवरीपर्यंत स्थगिती)

या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांनी ही बाब तात्काळ मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तर याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून सोमवारी (14जानेवारी) तोडगा निघेल असे सांगितले आहे.