Coronavirus Lockdown: लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील आंबा व्यवसायाला मोठा फटका

यात भारतही अडकला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे आंबा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे माल विकला जात नाही. तसेच आंबा इतर शहरांमध्ये नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असं पुण्यातील आंबा व्यापारी बलराज भोसले यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील आंबा व्यवसायाला फटका (PC - ANI)

Coronavirus Lockdown: जगभरातील सर्वच देशांना कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. यात भारतही अडकला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे आंबा व्यवसायाला (Mango Business) मोठा फटका बसला आहे. बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे माल विकला जात नाही. तसेच आंबा इतर शहरांमध्ये नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असं पुण्यातील आंबा व्यापारी बलराज भोसले यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

लॉकडाऊनमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, कलिंगड, खरबूज, द्राक्ष, भाजीपाला आदी पिकांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाची तोडणीही केलेली नाही. परिणामी शेतमाल शेतातचं सडून गेला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. (हेही वाचा - Lockdown च्या काळात 'घरबसल्या शिक्षण' या विषयावर उद्या दुपारी 3 वाजता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत विशेष वेबिनार, येथे पाहा लिंक)

आजारी बाळासाठी महिलेने ट्वीट करत मागितली मोदींना मदत;रेल्वेने राजस्थानवरुन मुंबईत २० लिटर दूध पाठवलं : Watch Video

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण जाहीर केलं आहे. त्यानुसार, शेतकरी आणि शेतमजूरांना विमा संरक्षण द्यावं, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे शेतीमाल सडून चालला आहे. सरकारने याचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाही. त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. सरकारने याचं भान ठेवावं, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.