Mangal Prabhat Lodha On Amruta Fadnavis: 'मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस', मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कौतुकाची परिसीमा

आपण 'मॅम नव्हे तर, माँ अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणेन', असे उद्गार मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी काढले आहेत. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

Mangal Prabhat Lodha On Amruta Fadnavis: 'मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस', मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कौतुकाची परिसीमा
Mangal Prabhat Lodha, Amruta Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजकीय फायद्यासाठी राजकारणी कोणाचेही नेतृत्व स्वीकारायला आणि कोणासही देवत्व द्यायला तयार असतात. याची उदाहरणे अनेकदा पाहायला मिळाली आहेत. असेच काहिसे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याकडूनही पाहायला मिळाले आहे. लोढा महोदयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना आता आपण 'मॅम नव्हे तर, माँ अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणेन', असे उद्गार काढले आहेत. अमृता यांच्या दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. या वेळी मृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मंडळी उपस्थित होती. याच वेळी लोढा यांनी अमृता यांचे कौतुक केले. मात्र, या वेळी त्यांनी कौतुकाची परिसीमाच गाठली.

'राजकारणात पुढाकार घ्या'

मंगल प्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक तोंडभरुन करताना म्हटले की, आपण मुंबईतील चौपाटीवर असलेला कचरा साफ करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेता. पण आता आपण राजकारणातील कचरा साफ करण्यासाठीसुद्धा पुढाकार घ्यायला हवा, अशी मी आपणास विनंती करतो. अमृता मुलामुलींसाठी जे काम करत आहेत ते पाहता मला वाटते त्यांनी आईचे रुप घेतले आहे. त्यामुळे मी आजपासून त्यांना मॅम अमृता नव्हे तर माँ अमृता फडणवीस म्हणेन. (हेही वाचा, Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव'म्हणत सर्वांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा)

क्षेत्र काणतंही असो स्वच्छता हवी- अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी म्हटले की, आपण शहरं, नद्या, समुद्र स्वच्छ ठेवायला पाहिजेत. आपण ते स्वच्छ राहतील याची काळजी घेऊन तेव्हाच आपली आर्थिक प्रगती साधू. कोणत्याही प्रकारची आर्थिक प्रगती साधण्यासाठी आधी आपण आपली शहरं स्वच्छ ठेवायला हवीत. आपण देव, धर्म मानणारे लोक आहोत. देवाला स्वच्छता आवडते. त्यामुळे क्षेत्र कोणतंही असो, आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. मग ते राजकारण असो किंवा आपले मन. कोणत्याही सेक्टरमध्ये काही ना काही घाण असते. त्यामुळे आपण स्वच्छतेवर भर द्यायला हवा. कॉर्पोरेट असो की पॉलिटीक्स आपण सर्वत्र स्वच्छता ठेवायला हवी, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानीही गणपती प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. त्यांच्या बंगल्यावर 10 दिवसांचा गणपती होता. या गणपतीच्या दर्शनासाठी भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार येऊन गेले. फडणवीसांच्या गणपतीचे मंगळवारी दुपारी विसर्जन करण्यात आले. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2024 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).