Maharashtra: दारुच्या नशेत आईवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा
या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Maharashtra: गोंदिया येथील एका व्यक्तीने त्याच्याच आईवर दारुच्या नशेत गेल्या वर्षात बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी त्या व्यक्तीला त्याच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी कारावास, 2 हजार रुपये दंड आणि पीडितेला 2 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.(Pune: सोशल मीडियात अश्लील शब्दांचा वापर केलेले व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या Theregaon Queen हिला अटक)
या प्रकरणाची चौकशी रावणवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, एका अधिकाऱ्याने सांगितले की, 19 जानेवारी रोजी न्यायालयात पुरावे तपासण्यात आले, 24 जानेवारी रोजी आरोपीचे जबाब नोंदवण्यात आले आणि 31 जानेवारी रोजी अंतिम सुनावणी झाली.(Mumbai: फी कमी करण्याचे आश्वासन देत व्यक्तीने विद्यार्थ्याला लावला 2 कोटी रुपयांचा चुना)
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 18 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिला तसेच जंगलात सोडून दिल्याबद्दल एका व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्टाने या व्यक्तीच्या आधीच्या जन्मठेपेच्या शिक्षेत वाढ केली. न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर मिथुन निसाद याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यात नागपुरातील विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. या व्यक्तीला भारतीय दंड संहिता मध्ये परिभाषित केल्यानुसार लैंगिक अत्याचाराच्या तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा अंतर्गत दोषी ठरवले होते.