Malls Shut Again: मुंबईसह आसपासच्या परिसरातील मॉल्स दोन दिवसातच बंद, जाणून घ्या यामागील कारण
मात्र मॉल्स फक्त 2 दिवसच सुरु ठेवल्यानंतर आजपासून पुन्हा बंद करावे लागले.
Mumbai: 130 दिवसांच्या दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर 15 ऑगस्टला मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील मॉल सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र मॉल्स फक्त 2 दिवसच सुरु ठेवल्यानंतर आजपासून पुन्हा बंद करावे लागले. खरंतर महाराष्ट्र सरकारच्या आदेशात असे म्हटले की, मॉल्स आणि त्यांच्या आउटलेट मधील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे सरकारच्या या नियमाचे पालन न झाल्यामुळे मंगळवारी दुपारी जवळजवळ सर्व मॉल्स बंद केले.(Delta Plus Variant Update: महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ, राज्यात रुग्णांचा आकडा पोहोचला 76 वर)
तर 15 ऑगस्ट पासून मॉल्स पुन्हा एकदा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. परंतु राज्य सरकारने सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आदेशात असे म्हटले की, मॉल मधील कर्मचाऱ्यांना कोविड19 च्या लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे.
आदेशात असे ही म्हटले की, मॉल संबंधित सर्व कर्मचारी आणि मॉल स्थित आउटलेट मधील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्यासह 14 दिवस पूर्ण झाले असावेत. त्यामुळे सरकारच्या या नियमाची पुर्तता न झाल्याने जवळजवळ सर्व मॉल्सच्या मॅनेजमेंटने ते पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारकडून मॉल्ससाठी नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या विधानात असे म्हटले की, महाराष्ट्रात आता सर्वसामान्यांसाठी मॉल सुरु केले आहेत. पण ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.(Mumbai Local: मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याने 1 लाखांहून अधिक नागरिकांनी काढले पास, फेऱ्या वाढवण्याचा निर्णय)
सरकारने आदेशात असे ही म्हटले की, सर्व मॉल्स 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि एखादे ओळखपत्र सोबत घेऊन सुद्धा जावे लागणार आहे. तर 18 वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झालेले नाही. त्याचसोबत मॉलमध्ये त्यांना प्रवेश हवा असल्यास आपल्या वयाचे प्रमाणपत्र सुद्धा दाखवावे लागणार आहे.