(File Image)

बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक (Malegaon Cooperative Sugar Factory Election) पार पडत आहे. या निवडणुकीसाठी मतदान (Malegaon Voting) आज (22 जून) सकाळपासून सात वाजलेपासून, सुरु झाले आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह संबंध पवार कुटुंबीयांमुळे बारामती आगोदरच वलयांकीत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर आणि पार पडलेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच स्थानिक पातळीवरील निवडणूक पार पडते आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. इतकेच नव्हे तर दस्तुरखुद्ध अजित पवार हे स्वत:च निवडणुकीच्या आखाड्यात ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून मैदानात असल्यामुळे ही उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. या निवडणुकीसाठी चौरंगी लढत होत आहे. सभासद कोणाला बहुमत देतात हे निकालानंतरच कळणार आहे.

चौरंगी लढत, कोणकोणते पॅनल रिंगणात?

माळेगाव सरकारी साखर कारखाना निवडणूक एकूण 21 जागांसाठी पार पडत आहे. त्यासाठी तब्बल 90 उमेदवार रिंगणणात आहेत. हे उमेदवार वेगवेगळ्या पॅनलमध्ये विभागलेले आहेत. त्यातील अपवादात्मक स्वतंत्रही आहेत. ही सर्व पॅनल खालीप्रमाणे:

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनेल
  • चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल
  • कष्टकरी शेतकरी समितीचा पॅनेल
  • काही अपक्ष

(हेही वाचा, Ajit Pawar On Dhirubhai Ambani: 'चोरुन' की 'सोडून'? अजित पवार यांचे धिरुभाई अंबानी यांच्याबद्दलचे वक्तव्य वादात)

किती जागा, उमेदवार आणि मतदार?

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी एकूण 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी 19 हजार 549 सभासद मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील एकूण 37 गावे येतात. त्या गावांतील 67 केंद्रांवर मतदान पार पडत आहे. मतदान केंद्रं पुढील प्रमाणे:

निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान

आज रविवारी 22 जून रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. एकूण ९० उमेदवार रिंगणात असून, कारखान्याचे 67 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत: गट क्रमांक 1 – माळेगाव : 11 केंद्रे, गट क्रमांक 2 – पणदरे : 13 केंद्रे, गट क्रमांक 3 – सांगवी-कांबळेश्वर : 8 केंद्रे, गट क्रमांक 4 – खांडज-शिरवली : 7 केंद्रे, गट क्रमांक 5 – निरावागज : 12 केंद्रे, गट क्रमांक 6 – बारामती : 15 केंद्रे, ब वर्गासाठी : 1 केंद्र, एकूण मतदान केंद्रांची संख्या – 67. (हेही वाचा, New Liquor Shop Licence: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने मांडला 2,160 नवीन दारू दुकानांना परवानगी देण्याचा प्रस्ताव; शिवसेनेच्या आक्षेपानंतर योजना स्थगित)

 दरम्यान, या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. खास करुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील पक्षीय पातळीवर निर्माण जालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे अधिक केंद्रीतपणे पाहिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीचा नेमका निकाल काय लागतो हे मंगळवारी (24 जून) रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.