MahaVitaran: कोल्हापूरमध्ये 62 शाळांचा विजपूरवठा तोडला, पुण्यात 792 शाळांचा वीजपूरवठा पूर्ववत; थकीत बिल वसूलीसाठी महावितरण आक्रमक
महावितरणने वीजबिल वसूलीसाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. विजबील थकीत असलेल्या ग्राहकांना आगोदर नोटीसद्वारे पूर्वसूचना आणि तरीही ग्राहकाने विजबील भरले नाही तर, थेट कारवाई, अशी मोहीम महावितरण राबवत आहे.
राज्यात नेहमीच चर्चेत असलेली महावितरण (MahaVitaran) कंपनी थकीत विजबील वसुलीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. महावितरणने वीजबिल वसूलीसाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. विजबील थकीत असलेल्या ग्राहकांना आगोदर नोटीसद्वारे पूर्वसूचना आणि तरीही ग्राहकाने विजबील भरले नाही तर, थेट कारवाई, अशी मोहीम महावितरण राबवत आहे. विजबील थकीत असलेल्या अनेक ग्राहकांचा विजपूरवठा (Power Supply) खंडीत करण्याची करावाई महावितरणने केली आहे. आता जिल्हा परिषद शाळाही महावितरणच्या रडारवर आल्या आहेत. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील जवळपास 62 जिल्हा परिषद शाळांचे विज कनेक्शन महावितरणने कायमस्वरुपासाठी तोडले आहे. तर 86 शाळांचं वीज कनेक्शन तात्पुरत्या स्वरुपात तोडण्यात आले आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातही अशीच भूमिका महावितरणने घेतली होती. मात्र, 792 जिल्हा परिषद शाळांची कापलेली विज कनेक्शन्स पुन्हा जोडण्यात आली आहेत.
कोल्हापूरमध्ये 62 जिल्हा परिषद शाळांच्या विजबील थकबाकीचा आकडा तब्बल 60 लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळे महावितरणसमोरही पर्याय उपलब्ध नाही. महावितरणचे विजबील इतक्या मोठ्या प्रमाणावर थकले आहे की, आपला अवजड डोलारा सांभाळणे स्वत: महावितरणलाच कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे महावितरण सतर्क झाले असून, विजबील वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. (हेही वाचा, Ahmednagar: विजेच्या धक्क्याने खेळाडू ठार; महावितरण अभियंता, TV Cable Owner सह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल)
कोरोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे विज कनेक्शन महावितरणने कापली तरी फारसा फरक पडत नव्हता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच हळूहळू शाळा पुर्वपदावर येत आहेत. अशात जर शाळांची विज कापली गेली तर त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांवर परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपकरणे वापरताना अडचणी येऊ शकतात.
दरम्यान, पुण्यातही जवळपास 792 शाळांची विज कनेक्शन्स महावितरणने कापली होती. विजबील न भरल्याने ही कारवाई करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर 192 शाळांचे थेट मीटरच काढून नेण्यात आले होते. त्यामुळे महावितरणच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा होती.